baramati
baramati 
पुणे

बारामतीत उभारली वॉर रुम...जाणून घ्या त्या मागचे कारण...  

मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाच्या संकटावर मात करण्याच्या उद्देशाने बारामतीत कोविड-19 वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचे समन्वयन करताना सर्व यंत्रणांचा समन्वयच नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही वॉर रुम स्थापन करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या बाबत माहिती दिली. तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे वॉर रुम प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस ही वॉर रुम कार्यरत असेल. 

शहरी किंवा ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला संस्थात्मक, गृह किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवायचे, याबाबत व्यवस्थापन समन्वय समितीशी समन्वय ठेवणे, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा करण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे, पोलिस विभागाशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीचे सीडीआर मिळविणे व संपर्क शोधणे, प्रतिबंधित क्षेत्राबाबतची नियमावलीची कार्यवाही होते की नाही, याबाबत पथके नेमून त्या बाबत देखरेख करणे, वॉर रुममध्ये आवश्यक स्टाफची नेमणूक करणे, उपलब्ध बेडची माहिती अभिलेख स्वरुपात तारिखनिहाय ठेवावी, अशा स्वरुपाचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. 

कोरोनाचे समन्वयन करताना सर्व यंत्रणांचा समन्वयच नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही वॉर रुम स्थापन करण्यात आली आहे. रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, त्यांना पुरेशी आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर अनेकांना नेमके काय करावे, हे समजत नसल्याने त्यांनाही याबाबत मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने ही वॉर रुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुमशी 02112-224386 या क्रमांकावर बारामतीकरांना संपर्क साधता येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT