आळंदी - कार्तिक वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत आहेत. सोबत अंथरून, पांगरून अन्‌ शिदोरी घेऊन. अशीच एक दिंडी बुधवारी सकाळी  आळंदीत दाखल झाली. अनेक मैल चालून दमलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीकाठी एका शेतातील झाडाचा आसरा घेतला.
आळंदी - कार्तिक वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत आहेत. सोबत अंथरून, पांगरून अन्‌ शिदोरी घेऊन. अशीच एक दिंडी बुधवारी सकाळी आळंदीत दाखल झाली. अनेक मैल चालून दमलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीकाठी एका शेतातील झाडाचा आसरा घेतला. 
पुणे

वारकऱ्यांच्या गर्दीने अलंकापुरी गजबलजी

सकाळवृत्तसेवा

आळंदी - खांद्यावर भगव्या पताका...गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी आळंदीत दाखल होत आहेत. दिंड्या आणि खासगी वाहनाने आलेले वारकरी ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांत मुक्कामाची सोय करण्याच्या लगबगीत आहेत.

आळंदीतील देऊळवाड्यात गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने शुक्रवारी (ता. ३०) कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ होत आहे. या सोहळ्यासाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून वारकऱ्यांचे आगमन होत आहे. सध्या धर्मशाळा आणि राहुट्यांमध्ये वारकरी मुक्कामास आहेत. अनेकांच्या राहुट्या आज तयार झाल्या तर काहींची राहुट्या उभारण्याबाबत लगबग सुरू होती. माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी सकाळपासूनच वारकऱ्यांची गर्दी होती. ठिकठिकाणी वारकऱ्यांचे हरिनाम सप्ताह सुरू आहेत. कीर्तन, प्रवचन, पारायण अशा नैमित्तिक कार्यक्रमात वारकरी दंग आहेत. 

दुसरीकडे, प्रशासनाची वारकऱ्यांना सेवा पुरविण्याची लगबग सुरू आहे. आळंदीतील एसटी बस स्थानकात बहुमजली शौचालय वारकऱ्यांसाठी सज्ज आहे. एसटी स्थानकात बॅरिकेडस उभारण्याचे काम सुरू आहे. शहरातील रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येत आहेत. दुसरीकडे रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करीत आहेत. दरम्यान, इंद्रायणीतील जलपर्णी काढण्याचे काम वेगात सुरू असून, वारीसाठी जादा पाणी सोडण्याची मागणी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT