लक्ष्मी रस्ता - उबदार कपड्यांच्या विक्रेत्यांपुढे ग्राहकांचा शुकशुकाट.
लक्ष्मी रस्ता - उबदार कपड्यांच्या विक्रेत्यांपुढे ग्राहकांचा शुकशुकाट. 
पुणे

ऊबदार कपड्यांच्या बाजारपेठेत गारठा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दरवर्षी दिवाळीपासून थंडीची हुडहुडी भरू लागते. मग ऊबदार कपड्यांच्या बाजारपेठाही बहरू लागतात. पण, यंदा अजूनही थंडीचे वातावरण काही केल्या निर्माण झालेले नाही. त्यामुळे ऊबदार कपड्यांच्या बाजारपेठाही काहीशा मंदावल्या आहेत. विक्री वाढण्यासाठी सवलत देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाणवणारी थंडी यंदा पावसाळा लांबल्याने अजून सुरू झाली नाही. अशा परिस्थितीत ऊबदार कपड्यांच्या बाजारात पाहणी केली, तर तिथेही विक्री मंदावल्याचे चित्र आहे. लक्ष्मी रस्त्यावरील ऊबदार कपडेविक्रेत्यांकडे ग्राहकांची वानवा आहे; तर तुळशीबागेतल्या दुकानदारांना स्वेटर्सविक्री वाढावी, यासाठी सवलत द्यावी लागत आहे. मोठ्या दुकानांपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यापर्यंत ऊबदार कपड्यांचा भरपूर साठा पडून आहे. त्याचे कारण म्हणजे पावसाच्या दीर्घ वास्तव्याने लांबलेला हिवाळा.

ऊबदार कपड्यांच्या विक्रीवर याचा परिणाम झाला आहे. पुण्यात येणारा माल दिल्ली व लुधियानावरून येतो. साधारण मार्च ते ऑगस्ट या काळात ही खरेदी केली जाते आणि विक्री फेब्रुवारीपर्यंत चालते. परंतु, लांबलेल्या पावसामुळे थंडीची तीव्रता म्हणावी तशी जाणवत नाही. नोव्हेंबरपर्यंत पाऊस न पडल्याने ऊबदार कपड्यांचा साठा तसाच राहिला. त्यामुळे खरेदी केलेल्या मालाची विक्री होईल की नाही, अशी चिंता विक्रेत्यांना भेडसावत आहे.

आमच्याकडे दरवर्षी स्वेटर्सची खरेदी दिवाळीपूर्वीच केली जाते. पण, या वेळी चित्र उलट आहे. दिवाळी होऊन पंधरा दिवसांचा काळ लोटला, तरी स्वेटर्सची अपेक्षित विक्री झालेली नाही. 
- भारत वैद्य, विक्रेते, लक्ष्मी रस्ता

गेल्या तीस वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय. दिवाळीपासून खरेदीसाठी गर्दी होऊ लागते. पण, पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे. मालाची विक्री होत नसल्याने काही प्रमाणात सवलत देण्याचा विचार आम्ही करीत आहोत.
- रोहित कर्वे, विक्रेते, तुळशीबाग

यंदा विक्री नक्कीच उशिरा सुरू झाली आहे. याचा प्रत्यक्ष विक्रीवर होणारा परिणाम हा पुढील तीन महिन्यांत पडणाऱ्या थंडीच्या सातत्यावर अवलंबून आहे. 
- अमोल पेटकर, विक्रेते, शिवाजी रस्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT