वरुड सरोवर उपक्रमासाठी निधी आणू
अंकुश गोरे; भैरवनाथ यात्रेनिमित्त भारती गोरे यांच्या प्रचारार्थ ग्वाही
औंध, ता. ३ : वरुड येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य रथोत्सव सोहळ्यात अंकुश गोरे आणि भारती गोरे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी वरुड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम भूमिका मांडत पर्यटन, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आश्वासने दिली.
वरुड सरोवर हा उपक्रम केवळ औंध गटापुरता मर्यादित न राहता, येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल, असा विश्वासही श्री. गोरे यांनी यावेळी व्यक्त केला. योग्य नियोजन, दर्जेदार विकासकामे आणि लोकसहभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प राज्यातील आदर्श पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी बोलताना भारती गोरे म्हणाल्या, ‘‘वरुड येथे प्रती कास तलावाची आकर्षक प्रतिकृती साकारली असून, या परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. औंध व वरुड परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.’’
ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड व परिसरातील विकासकामांसाठी नेहमीच कृतिशील पावले उचलली जातील, असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, पर्यटन विकास, युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरण या सर्व बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
श्री भैरवनाथ रथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
.........................................
पर्यटनवाढीसाठी पाठपुरावा
वरुड सरोवर उपक्रम हा ग्रामस्थ, समन्वयक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेला आदर्श उपक्रम आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करणार असून, पर्यटनवाढीसाठी आवश्यक असलेला अंदाजे दोन कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही अंकुश गोरे यांनी या वेळी दिले.
.....................................................
फोटो :..........00702
वरुड : श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त उपस्थित अंकुश गोरे, भारती गोरे यांच्यासमवेत उपस्थित मान्यवर.
.....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.