watch on record criminals to prevent vehicle theft crime pune police
watch on record criminals to prevent vehicle theft crime pune police Sakal
पुणे

Pune News : वाहनचोरी रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरात वाहनचोरीच्या घटना रोखण्यासाठी वाहन चोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. तसेच, वाहन चोरीच्या घटनेनंतर तातडीने गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सर्व युनिटला दिल्या आहेत.

शहरात वाहनचोरीच्या घटना वाढत आहेत. त्यात विशेषत: दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेने त्यावर सूक्ष्म उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वाहनचोरी रोखण्यासाठी इ-चलनचा डेटा अद्ययावत करण्यात येत आहे. नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी आणि घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हे उघडकीस आणण्यावर भर देण्यात येणार आहे.

दोनपेक्षा वाहनचोरीचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात कमी पैशांत विक्री केली जात असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे आठवडी बाजारांमध्ये येणाऱ्या दुचाकींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्यास तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळण्यास अडचणी येतात. वाहनचोरीचा तातडीने गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जेणेकरून सीसीटीव्ही चित्रीकरण वेळेत तपासून गुन्ह्याची उकल करणे शक्य होइल.

- शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.

बेवारस वाहने लिलावात काढणार

वाहनाचा विमा असल्यास बहुतांश वाहनमालक अपघातग्रस्त वाहन घेउन जात नाहीत. विमा कंपनीनेही ते वाहन ताब्यात न घेतल्यास ती तशीच पडून राहतात. वाहतूक शाखा आणि पोलिस ठाण्यांच्या आवारात जुनी आणि बेवारस वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. याबाबत न्यायालयाची परवानगी घेउन जाहीरनामा काढून अशा बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

Chandrapur Exit Poll: सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार? एक्झिट पोल सांगतोय धक्कादायक अंदाज

SCROLL FOR NEXT