Junnar1
Junnar1 
पुणे

पुणे जिल्ह्यात पुलांवरून पाणी; जनजीवन विस्कळित 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नीरा, गुंजवणी, वेळवंड, मुळा, मुठा, भीमा, इंद्रायणी, मीना, कुमंडला या नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहिल्याने दळणवळण ठप्प झाले.

मावळ खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आहे. पुराच्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीवरील संपूर्ण घाट बुडाला आहे. भक्ती सोपानपूल पाण्याखाली गेला आहे. जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

खेड तालुक्‍यातील कडूस-कारामळी येथील कुमंडला नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्याचा दळणवळण संपर्क ठप्प झाला आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे राजगुरुनगरचा केदारेश्वर बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. चासकमान धरणातून पाणी न सोडता भीमेला पूर येण्याचा प्रसंग गेल्या कित्येक वर्षांत घडला नव्हता.

चाकण परिसरात शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू झाल्याने ओढे, नाले वाहू लागले आहेत. रस्त्यावर व महामार्गावर पाणी मोठ्या प्रमाणात काही भागात साचले आहे. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मुसळधार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला आहे.

वेल्हे तालुक्‍यातील गुंजवणी धरण क्षेत्रातील घेवंडे, निवी, घिसर व वाड्या-वस्त्यांकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. जलसंपदा विभागाकडून विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ यांना ये-जा करण्यासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील मीना नदीच्या खोऱ्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले आहे. आपटाळे ते शिंदे या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. 
पावसाचा जोर इतका आहे की, या पुलावरून व पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावरून तब्बल तीन फुटांहून पाणी वाहत आहे. आंबेगाव तालुक्‍याच्या सातगाव पठार परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावत असून, वेळ नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. पेठ गावातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून वेळ नदीचे पाणी काही काळ वाहत होते. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळित झाली होती.

मुळशी तालुक्‍यातील आंदेशे व मांदेडे या गावांना जोडणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहिल्याने या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तसेच, अमराळेवाडीजवळील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहिल्याने सुतारवाडी व अमराळेवाडीदरम्यानची वाहतूक बंद झाली होती. 

मंदोशी ते तळेघर मार्गातील घाटरस्ता खचला... 
खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातून श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारा मंदोशी ते तळेघर मार्गातील घाटरस्ता मुसळधार पावसाने खचला आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने रस्ता खचला त्यावेळेस कोणतेही वाहन तेथून मार्गस्थ होत नव्हते; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT