Water-Theft
Water-Theft 
पुणे

#WaterIssue पाणीचोरांना चाप

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात पाणीटंचाई असूनही पाटबंधारे खात्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे हात ओले करीत कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांना आता चाप बसणार असून, पाणीचोरांविरोधात फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. त्याशिवाय, विद्युत मोटारी जप्त करून अशा लोकांकडील वीजजोडणी तोडली जाणार आहे.

पाणीचोरांविरोधात कठोर पावले उचलण्याचा आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाटबंधारे खाते-महावितरणला दिला आहे. उजवा मुठा कालव्यातून पाणीचोरी होत असल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात सध्या जेमतेम सव्वापाच अब्जघन फूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातून शेतीसह पुणेकरांना येत्या १५ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. खबदारीचा उपाय म्हणून पाणीकपात करावी लागण्याची चिन्हे असल्याने पुणेकरांना काटकसरीने पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. दुसरीकडे मात्र कालव्यातून पाणीचोरी होत असल्याचे उघड झाले आहे.

कालव्यातून विद्युत मोटारींच्या माध्यमातून पाणी उपसा करून ते टॅंकरद्वारे विकण्याचा उद्योग केला जात आहे. पाणीटंचाईचा फायदा घेऊन चढ्या भावाने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करीत असल्याच्या तक्रारी आहेत.
विशेष म्हणजे, पाणीचोरी करणारे आणि टॅंकर लॉबीला पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे यानिमित्त दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा चोरीच्या पाण्याचा मार्ग सापडला. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री बापट यांच्याकडे विचारणा केली असता असे प्रकार रोखण्याचा आदेश संबंधित खात्यांना त्यांनी दिला.

बापट म्हणाले, ‘‘पुणेकरांना पाणी कमी पडू नये म्हणून उपाय केले जात आहेत. मात्र, अशा काळात पाण्याची चोरी करणाऱ्यांविरोधात फौजदारी दाखल करण्यात येईल. या लोकांना पाठीशी घालू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे खात्याला केल्या आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT