पुणे

दौंड रेल्वे स्थानकावर पाणीटंचाई, 95 प्रवासी गाड्यांना फटका

सकाळवृत्तसेवा

दौंड : सोनवडी (ता. दौंड) येथील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने दौंड रेल्वे स्थानक आणि रेल्वे वसाहत मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थानकावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. दररोजच्या 95 गाड्यांना या टंचाईचा फटका बसला असून रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्थानकांवर प्रवासी गाड्यांमध्ये पाणी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सोनवडी येथे भीमा नदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यातून पाणी उपसा करून दौंड शहरातील रेल्वेच्या शुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. तेथून शुद्ध केलेले सुमारे 45 लाख लिटर पाणी दौंड रेल्वे स्थानक आणि 1100 कुटुंबे असणाऱ्या रेल्वे वसाहतीला पुरविले जाते. परंतु, पाणी नसल्याने स्थानक, वसाहत, रेल्वे स्थानकावरील उपहारगृह आणि रेल्वेच्या विविध कार्यालयात वापरासाठीचे पाणी नसल्याने सर्वांची गैरसोय झाली आहे. दौंड नगरपालिकेने रेल्वे हद्दीत नळकोंडाळे दिल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे. पुर्नप्रक्रिया केलेले पाणी वापरून रेल्वे स्थानकाची स्वच्छता केली जात आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या मांडल्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत पुरवठा करण्याची मागणी केली होती. दरम्यान तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जून 2019 पर्यंत ही पाणीटंचाई कायम राहणार असल्याने रेल्वे प्रशासन चिंतेत आहे.

दौंडचे रेल्वे स्थानक व्यवस्थापक सॅम्युएल क्लिफ्टन यांना आज (ता. ५) या बाबत विचारले असता ते म्हणाले, `` स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ कोंडाळे आणि पाच सशुल्क वॅाटर वेंडिंग मशिन्स बंद आहेत. जलसंपदा विभागाने पुढील तीन दिवसांत पाणी देण्याचे कळविले आहे. पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. टॅंकरने पाणी आणून ते रेल्वेच्या वितरण टाक्यांमध्ये भरून पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दररोज 95 गाड्यांमध्ये पाणी भरले जाते

दौंड रेल्वे स्थानकावर दररोज लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांसह शटल, पॅसेंजर, डीएमयू, आदी 95 प्रवासी गाडयांमध्ये पाणी भरले जाते परंतु पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्थानकावर दररोज 10 हजार 900 प्रवाशांची ये - जा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT