पुणे

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर चंदननगरमधील 'हा' प्रश्न मार्गी

सुषमा पाटील.

रामवाडी (पुणे) : चंदननगर येथील टाटा गार्डरूमजवळ महापालिकेकडून बसवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची व परिसराची दुरवस्था झाली होती. तसेच, नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जात नाही, अशी तक्रार केली जात होती. या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांसह नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी दिला. त्यामुळे बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याच्या टाकीची कामे तातडीने पूर्ण करण्यात आली.   

येथील टाकीचे झाकण गायब झाले होते. टाकीतून काही ठिकाणी दिवस-रात्र गळती होत असल्याने वर्षभरात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. मुख्य प्रवेशद्वार तुटला असल्याने आतमध्ये मोकाट जनावरांचा वावर अधिक वाढला होता. टाकीच्या दिशेने वर जाण्यासाठी असलेल्या जिन्याला सुरक्षिततेसाठी गेट नसल्याने कोणीही व्यक्ती तसेच, प्राणी सहजपणे ये-जा करत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा स्वच्छ होत असला, तरी ज्या टाकीत पाणी जमा होते. तिची स्वच्छता कित्येक वर्षांपासून झालेली नाही, अशी ही तक्रार नागरिकांकडून करण्यात आली होती. टाकीवर झाकण नसल्याने धुळीबरोबर येणारा कचरा पाण्यात पडत होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने टाकीची सुरक्षितता व स्वच्छतेसह अन्य कामे मार्गी लावावी, ही मागणी केली होती. पाण्याच्या टाकीची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने कामे पूर्ण करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांचे आरोग्य व टाकीची सुरक्षितता लक्षात घेऊन टाकीवर झाकण बसवण्यात आले. तसेच, टाकीच्या दिशेने वर जाण्यासाठी असलेल्या जिन्यावर व मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेट बसवण्यात आले आहे.
- एकनाथ गाडेकर, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, बंडगार्डन  

लॉकडाउनच्या काळात कुठलेही टेंडर नसताना प्रशासनाने पाण्याच्या टाकीसह इतर जी कामे होती, ती पूर्ण केली आहेत. अत्यंत कौतुकास्पद असे काम प्रशासनाकडून करण्यात आले.
- भय्यासाहेब जाधव, नगरसेवक 

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT