pune-water-tax
pune-water-tax 
पुणे

करार न केल्यास पाणीपट्टी दुपटीने आकारणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पाणीकराराच्या मुद्द्यावरून जलसंपदा विभाग आणि महापालिकेदरम्यान पुन्हा जुंपण्याची शक्‍यता आहे. पाणी कराराची मुदतवाढ संपुष्टात येऊनही महापालिकेकडून नव्याने पाणी करार करण्यात आलेला नाही. मात्र, आता नोव्हेंबरअखेर पाणी बिलाची थकीत रक्‍कम भरून पाणी करार न केल्यास पाणीपट्टी दुपटीने आकारण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

यासंदर्भात जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनाला सोमवारी (ता. ११) पत्र पाठविले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात पाणीवाटप करार होणे अनिवार्य आहे. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात १ मार्च २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१९ या सहा वर्षांसाठी पाणी करार झाला होता. ही मुदत फेब्रुवारीत संपली. त्यानंतर ९० दिवसांत कराराचे नूतनीकरण अपेक्षित आहे. हा करार न झाल्यामुळे जलसंपदा विभागाने नवीन करारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली. मात्र, महापालिकेने कार्यवाही केली नाही. निवडणुकांमुळे हा प्रश्‍न दुर्लक्षिला गेला.

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार, महापालिकेने साडेआठ अब्ज घनफूट (टीएमसी) वार्षिक पाणी वापर करणे अपेक्षित होते. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारने पाणी कोट्यात वाढ करून तो ११.५० टीएमसी करण्यात आला. महापालिका प्रशासनाकडे मार्च २०१७ ते जून २०१९ या कालावधीत १४६ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी होती. ती पुनर्गठित करून १२८ कोटी २६ लाख रुपये करण्यात आली. या थकीत रकमेपैकी महापालिकेकडून जलसंपदाला ८८ कोटी २८ लाख रुपये प्राप्त झाले. उर्वरित ४० कोटींची रक्‍कम थकीत आहे. ती भरल्याशिवाय करार होणार नाही, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. 

महापालिकेकडे अद्याप ३९ कोटींची थकीत रक्‍कम आहे. ती रक्‍कम महापालिका प्रशासनाने जमा करावी. महापालिकेला नव्याने पाणी करार करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. नोव्हेंबरअखेर पाणी कराराचे नूतनीकरण न केल्यास दुपटीने पाणीपट्टी आकारण्यात येईल, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनाला पाठविले आहे.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT