Fursungi Traffic News Sakal
पुणे

Fursungi Traffic News : व्यापाऱ्यांच्या अडमुठी भूमिकेने फरसुंगीकरांची कोंडी

आठवडे बाजारच्या दिवशी व्यापाऱ्यांकडून दुकाने रस्त्यावरच थाटल्याने फुरसुंगीत गुरवाचा दिवस कोंडीचा ठरत आहे.व्यापाऱ्यांना दुकाने मंडईमध्ये लावण्यास बांधनकारक करावे असे येथील नागरिकांडून मागणी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

फुरसुंगी : आठवडे बाजारच्या दिवशी व्यापाऱ्यांकडून दुकाने रस्त्यावरच थाटल्याने फुरसुंगीत गुरवाचा दिवस कोंडीचा ठरत आहे.व्यापाऱ्यांना दुकाने मंडईमध्ये लावण्यास बांधनकारक करावे असे येथील नागरिकांडून मागणी होत आहे.

येथील भाजी मंडई एक एकर जागेत आहे.पूर्वी येथे वाढणारे गवत आणि झाडांमुळे जागा अपुरी उपलब्ध होत होती.बाजारच्या दिवशी बाहेर गावावरून अनेक व्यापारी येत असतात.त्यांच्या संख्या पाहून प्रशासनाने येथील जागा स्वच्छ करून बसण्यायोग्य करून दिली आहे. मात्र काही व्यापारी या जागेचा वापर न करता मंडईच्या बाहेर रस्त्यालगत दुकाने थाटत असताना दिसत आहेत.

गावामध्ये जाणाऱ्या मुख्य मार्गावरच मंडई आहे. व्यापाऱ्याच्या या अडमुठी भूमिकेमुळे गावात जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होऊन पूर्ण दिवस कोंडीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.त्यांच्याकडे येणारे ग्राहक वाहने रस्त्यावरच उभा करत असल्याने वाहतुकीस कमी जागा उपलब्ध होऊन वाहन चालकांच्या शाब्दिक चकमकी होत आहेत.

वाहतुकीस अडथळा करणाऱ्या व्यावापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना मंडईच्या आता बसने बंधनकारक करावे याने वाहतुक कोंडीतून सुटका होईल असे स्थानिक नागरिक संतोष हरपळे,राहुल हरपळे,पांडुरंग रोडे यांनी सांगितले.

संदीप हरपळे (स्थानिक नागरिक): मंडई अध्यक्षांनी याबाबत व्यापाऱ्यांना सूचना करणे गरजेचे आहे.गुरुवार हा येथील दवाखान्यातील गरोदर माता आणि बाळाचा लसीकरणाच्या दिवस आहे.मातांना बाळासोबत कोंडीतून वाट काढत दवाखान्यात जाणे जिकरीचे ठरत आहे.

- सुनील भाडळे( अध्यक्ष,खडकेश्वर भाजी मंडई): स्थानिक

व्यापारी मंडई मधेच दुकाने लावत असतात.बाहेर गावच्या व्यापारयांना याबाबत सूचना केल्या आहेत. प्रशासनाने बेशिस्त व्यापारयांवर दंडात्मक कारवाई करावी.

धम्मानंद गायकवाड (अतिक्रमण निरीक्षक हडपसर क्षेत्रीय कार्यालय): अतिक्रमण कारवाई सतत चालूच आहे.येथील पाहणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

Mumbai News: आझाद मैदानाशेजारील दुकानं बंद होणार, स्टॉलधारकांवर पालिकेचा कारवाईचा बडगा

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT