sant-tukaram-palkhi
sant-tukaram-palkhi 
पुणे

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वडापुरी येथे उत्साहात स्वागत

आदम पठाण

वडापुरी - जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वडापुरी (ता. इंदापूर) येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी करून भक्तीमय वातावरणात सायंकाळी ७ वाजता काटी चौकात ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.

गोपाळपूर (पंढरपूर) येथिल श्रीकृष्ण मंदीरातील गोपाळकाला झाल्यानंतर शुक्रवार दिनांक २७ जुलै रोजी तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुकडे परतीच्या पायी प्रवासासाठी निघाला असून वडापुरी येथे सांयकाळी ७ वाजता पालखीचे टाळ पकवाजाच्या गजरात स्वागत करून वडापुरी येथील निवृत्ती थोरात यांच्या घरी पालखीचा मुक्काम झाला. रविवारी रात्री बापूसाहेब देहूकर महाराज यांचे कीर्तन झाले यावेळी सुभाष थोरात, निवृत्ती थोरात, हरिदास थोरात, महाप्रसाद थोरात या कुटूंबीयाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.  

कीर्तनानंतर पहाटे शेज आरती, गावकऱ्यांच्या वतीने जागर पालखीची पाद्यपूजा व शिंगाडा वाजवून पालखीचे आज ३० रोजी प्रस्थान झाले यावेळी हजारो ग्रामस्थांनी तुकोबांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पालखी रथाच्या सर्वात पुढे पालखी नगारा रथ त्याच्या पाठीमागे टाळकरी व विणेकर्‍यांचा मोठा ताफा आसुन जवळ जवळ १३०० ते १४०० वारकरी पालखी सोहळ्याबरोबर परतीच्या प्रवासात चालत आहे.सोमवारी सकाळी ७ वाजता वडापूरी येथुन पालखी सोहळा देहूच्या दिशेने इंदापूरकडे मार्गस्थ झाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT