Sharad Pawar
Sharad Pawar 
पुणे

पुण्याने 'पवारांना' काय दिले?; शरद पवारांची खंत

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्या जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे 'पुणे एकेकाळी' या कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

या पुस्तकात पुणे शहरातील अनेक महत्त्वाच्या वास्तूंचा समावेश आहे आणि त्याबाबतची खास माहिती देखील देण्यात आली आहे. यावेळी  बोलताना पवार म्हणाले, प्रभात टॉकिज, विजयानंद टॉकिज, गोखले हॉल, काँग्रेस भवन, एसएसपीएमएस कॉलेज, वानवडीचा शिंदे पॅलेस यासोबतच डेक्कन जिमखाना परिसरातील अनेक बंगले देखील नरहर पवार यांनी बांधले. याच पवारांनी सेवासदनमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी देखील प्रयत्न केले. ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलांसाठी क्वार्टर्स बांधली. मात्र या पवारांनी इतक्या वास्तू पुण्यात बांधल्या तरी पुणेकरांनी 'पवारां'वर मेहरबानी दाखवली नाही, असा चिमटा पवारांनी काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT