पुणे

ठेकेदारासाठी पीएमपीची सेवा कशाला?

सकाळ वृत्तसेवा

पुणे-  टिळक रस्त्यावर बंद पडलेल्या ठेकेदाराच्या बसच्या दुरुस्तीसाठी गेलेल्या पीएमपीच्या सर्व्हिस व्हॅनवर झाड कोसळून चालकाचा नुकताच मृत्यू झाला. बंद पडलेली बस ही ठेकेदाराची होती, तर मग पीएमपी प्रशासनाने स्वतःची सर्व्हिस व्हॅन का पाठवली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ६०० बस भाडेतत्त्वावरील आहेत. या बस वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या आहेत. पीएमपीने या बस भाडेतत्त्वावर घेताना संबंधित बसवर चालकाची नियुक्ती, बसची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर सोपवली आहे. त्यामुळे या बस मार्गावर बंद पडल्यास दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची आहे.

गेल्या बुधवारी टिळक रस्त्यावर बंद पडलेली बस ही ठेकेदाराची होती. ही बस मार्गावरून ओढून नेऊन ती दुरुस्त करणे ठेकेदाराचे काम होते. परंतु, पीएमपी प्रशासनाने ही बस ओढून नेण्यासाठी स्वतःची सर्व्हिस व्हॅन पाठवली. याच सर्व्हिस व्हॅनवर झाड कोसळले आणि त्यात चालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांकडून याबाबत आता पीएमपी प्रशासनाला जाब विचारला जात आहे. यानिमित्ताने ठेकेदारांच्या बसची देखभाल दुरुस्तीही पीएमपीलाच करावी लागत असल्याचे उघड झाले आहे. 

टिळक रस्त्यावर बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता होती. यामुळे त्या ठिकाणी पीएमपीच्या ताफ्यातील सर्व्हिस व्हॅन पाठविण्यात आली होती.
- सुभाष गायकवाड,  जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT