पुणे

बालविवाह उच्चाटनासाठी प्रयत्नशील राहणार : डॉ. धेंडे 

सकाळवृत्तसेवा

येरवडा : महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील वस्त्यांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. शेजारसमूह, स्वयंसहायता बचत गट, संयोगिनींच्या माध्यमातून शहरातील बालविवाहाचे उच्चाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. 

विश्रांतवाडी चौकातील मुकुंदराव आंबेडकर चौकात निर्माण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बालविवाहविरोधी अभियानाची सुरवात करताना डॉ. धेंडे बोलत होते. या वेळी निर्माण संस्थेचे वैशाली भांडवलकर, संतोष जाधव, युनिसेफचे प्रतिनिधी जयंत पवळीकर, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, सुनील साळुंखे उपस्थित होते. 

डॉ. धेंडे म्हणाले, "पुणे शहर विद्येचे माहेरघर असताना येथे बालविवाह होत आहेत ही खेदाची बाब आहे. विशेषत: शहरातील वस्त्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आहे. पोलिसांनी बालविवाह रोखण्यासाठी त्यांच्या हद्दीतील भटजी, बॅंडवाले, मंगल कार्यालय आदींची माहिती संकलित करण्याची गरज आहे, तरच बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल.'' 

भांडवलकर म्हणाल्या, "बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी होऊन, अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे औचित्य साधून बालविवाह प्रतिबंधक संदर्भात भिंत्तीपत्रकाचे प्रकाशन केले आहे. शहरातील वस्त्यांमध्ये एक ते 25 नोव्हेंबरदरम्यान बालविवाहविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.'' 

जिल्ह्यात 19 टक्के बालविवाह 
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या 2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील 16 जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. पुणे जिल्ह्यात बालविवाहचे प्रमाण हे 19.4 टक्के असल्याचे निर्माण संस्थेचे संतोष जाधव यांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT