shivtare
shivtare 
पुणे

ग्रामीण कृषीपंपासाठी वीजजोडणी लवकरच मिळणार : शिवतारे

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रकरणे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे लवकरच मार्गी लावली जातील व वीजजोड मिळतील; असे जलसंपदा, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथे स्पष्ट केले. सर्व ग्रामपंचायतीत यापुढील काळात वीजविषयक तक्रारी करण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्याचा व त्यांचा निपटारा करण्याचेही शिवतारेंनी आदेश दिले.

सासवडला तालुका पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या वीज विषयक विविध प्रश्नांवर ही बैठक आज झाली. यावेळी सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्ता काळे, जि.प.सदस्य दिलीप यादव, पं.स.सदस्य रमेश जाधव, तहसीलदार अतुल म्हेत्रे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कामठे यांच्यासह ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच व शेतकरी, नागरीक उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी वीज वारंवार खंडित होणे, अवास्तव वीजबिले येणे, मीटर नादुरुस्त असणे, शेतीपंपांची वीजजोडणीसाठी प्रलंबित प्रकरणे राहणे, रीडिंग वेळेवर न घेणे अशाही विविध तक्रारी बैठकीत शिवतारे यांच्याकडे मांडल्या. यावर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना शिवतारे यांनी केल्या. सर्व तक्रारींवर पुन्हा पुढील महिन्यात बैठक घेतली जाईल. त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन होईल याची दक्षता घ्यावी; असेही शिवतारेंनी अधिकाऱ्यांना बजावले.

अनेक वर्षापासून शेतीपंपासाठी वीजजोड मिळत नसल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेत शिवतारे म्हणाले, मागील काही काल विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याच्या धोरणामुळे महावितरणाला पश्चिम महाराष्ट्रात फारसा निधी व साहित्य मिळाले नाही. मात्र शासनाने खास शेती पंपासाठी नव्याने योजना तयार केली असून त्यात प्रत्येक शेतकऱ्याला छोटे आणि स्वतंत्र रोहित्र दिले जाणार आहे. त्यामुळे दाब वाढण्याचा आणि वारंवार वीज खंडित होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सौभाग्य योजनेतून तालुक्यातील 542 कुटुंबांना मोफत वीज देण्यात आलेली आहे. सर्व ग्रामपंचायतीत यापुढील काळात वीजविषयक तक्रारी करण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात येणार आहे. त्यात आपापल्या तक्रारी लोकांनी नोंदवाव्यात. दरमहा त्यांचा निपटारा केला जाईल; असेही शिवतारे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT