4thief_13.jpg
4thief_13.jpg 
पुणे

जलतरण तलावाच्या 'चेंजिंग रूम'मधून महिलेचे मंगळसूत्र लंपास 

सकाळवृत्तसेवा

पुणे ः जलतरण तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेने कपडे बदलण्याच्या खोलीतील (चेंजिंग रूम) कपाटामध्ये ठेवलेले 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. हा धक्कादायक प्रकार गोखलेनगर येथे शुक्रवारी सकाळी घडला. 

याप्रकरणी सेनापती बापट रस्ता येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गोखलेनगर येथील एका जलतरण तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यासाठी त्या संबंधित जलतरण तलावामध्ये नियमितपणे येतात.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी पावणे सहा वाजता त्या जलतरण तलावामध्ये आल्या. त्यानंतर त्यांनी तेथील कपडे बदलण्याच्या खोलीतील वस्तू ठेवण्याच्या कपाटामध्ये त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून पर्समध्ये ठेवली. पोहल्यानंतर त्या पुन्हा संबंधित खोलीमध्ये आल्या. त्यानंतर त्यांनी कपाट उघडले, त्यावेळी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ चतुःश्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर.एस.सरडे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT