women
women 
पुणे

कर्णबधिर आजीबाईंना पदपथावर सोडून गेलेल्या नातेवाईकांचा शोध सुरू 

दिलीप कुऱ्हाडे

पुणे : हरी गंगा सोसायटीच्या पदपथावर गेल्या दीड वर्षांपूर्वी ७५ वर्षांच्या आजींना त्यांच्या नातेवाईकांनी बेवारसपणे सोडून गेले. त्या कर्णबधिर असल्यामुळे पोलिसांनी त्यांना भिक्षेकरी स्विकार केंद्रात ठेवले. भिक्षेकरी स्विकार केंद्राला त्यांचा पत्ता शोधणे अवघड झाले. त्यामुळे त्यांचे छायाचित्र प्रसारमाध्यमांना देऊन त्यांच्या नातेवाईकांचा शोध घ्या असा, आदेश न्यायालयाने भिक्षेकरी स्विकार केंद्राला दिला आहे. 

दीड वर्षांपूर्वी अज्ञात व्यक्ती रिक्षा मध्ये येऊन आजीबाईंना हरिगंगा सोसायटीच्या पदपथावर टाकून पळून गेले. महिला कर्णबधिर असल्यामुळे त्यांचा पत्ता शोधणे अवघड होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या व तनिष्का सदस्या सिंधूताई गोळे यांनी आजीबाईंची अवस्था पाहून त्यांना पोलिसांच्या मदतीने भिक्षेकरी स्विकार केंद्रात ठेवले. केंद्राने त्यांच्याशी अनेक प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी त्यांचे छायाचित्र प्रसारमाध्यमांना देण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने ती तत्काळ मान्य करीत त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याचे आदेश दिले. त्यामुळे आजींच्या नातेवाईकांना पाहिले का असा प्रश्‍न पडला आहे. तर ज्येष्ठ नागरिक कायदा असून देखील मुले असो किंवा मुली आपल्या पालकांना कशा प्रकारे वागणूक देतात याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्ती केली आहे. 

‘‘भिक्षेकरी स्विकार केंद्राच्या नियमाप्रमाणे येथील भिक्षेकऱ्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करीत येत नाही. मात्र विशेष बाब म्हणून व कर्णबधिर ज्येष्ठ नागरिक महिला भिक्षेकरी नसल्यामुळे न्यायालयाला त्यांच्या नातेवाईकांच्या शोधासाठी त्यांचे छायाचित्र प्रसारमाध्यमांना देण्याची परवानगी दिली आहे. ’’
- शुभांगी कांबळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे

‘‘केंद्र व राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक कायद्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शेल्टर्स हाऊस उभारले आहेत. मात्र यामध्ये अनाथ, निराधारांनाच ठेवता येते. नातेवाईकांनी विशेषत: मुला-मुलींनी ज्येष्ठ नागरिकांना बेघर केल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते. त्यांच्याकडून आई-वडिलांसाठी घरखर्च, वैद्यकीय खर्च मिळवता येऊ शकते.’’
- ऍड असुंता पारधे, अध्यक्ष, चेतना महिला विकास केंद्र, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT