Crime News
Crime News esakal
पुणे

Murder Case : महिलेच्या खून प्रकरणाला नाट्यमय कलाटणी: फिर्यादीनेच खून केल्याचे निष्पन्न

रवींद्र पाटे

महिलेचा खून मुलाने केला नसून नवऱ्याने केल्याचे व या खून प्रकरणात फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

नारायणगाव - शिरोली तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील महिलेच्या खून प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. महिलेचा खून मुलाने केला नसून नवऱ्याने केल्याचे व या खून प्रकरणात फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला आज दुपारी अटक केली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पत्नी अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६०, राहणार शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर) यांचा खून केल्याप्रकरणी पती बारकू सखाराम खिलारी (वय-६६) याला आज दुपारी अटक करण्यात आली आहे.

या बाबत सहायक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले बारकू खिलारी, पत्नी अंजनाबाई व दोन गतिमंद मुले यांच्या समवेत शिरोली तर्फे आळे येथे वास्तव्यास आहेत. शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. आर्थिक परिस्थिती खालावल्याने शेत जमीन विक्री करण्याचा निर्णय बारकू खिलारी यांनी घेतला होता. मात्र त्यांची पत्नी अंजनाबाई यांचा शेती विक्री करण्यास तीव्र विरोध होता. या वरून मंगळवारी (ता. १५) दुपारी त्यांच्यात झालेल्या वादातून बारकू याने राहत्या घरात पत्नी अंजनाबाई यांच्या डोक्यात खोरे मारून खून केला. या वेळी त्यांचा गतिमंद मुलगा अमोल उपस्थित होता.

तंबाखूसाठी पैसे न दिल्याने गतिमंद मुलगा अमोल याने डोक्यात खोरे घालून पत्नी अंजनाबाई हिचा खून केला असल्याचा बनाव बारकू खिलारी याने केला. याबाबतची फिर्याद बारकू खिलारी याने मंगळवारी दुपारी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली.फिर्यादी वरून पोलिसांनी रात्री अमोल याला अटक केली. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी रक्ताचे डाग असलेले बारकू खिलारी याचे कपडे सापडले. त्या नंतर रात्री ताटे, फौजदार सनील धनवे यांनी कसून चौकशी केली असता फिर्यादी असलेला बारकू हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. बारकू खिलारी याने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढिल तपास सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT