कोल्हेवाडी - झाडाची पडलेली फांदी.
कोल्हेवाडी - झाडाची पडलेली फांदी. 
पुणे

प्रसंगावधानाने वाचले कामगारांचे प्राण

नीलेश बोरुडे

पुणे - सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. आजही तीच अवस्था होती. चेंबर फुटल्याने सर्व ड्रेनेजची घाण रस्त्यावर साचली होती. वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूंना लागलेल्या होत्या. खड्ड्यात खूप पाणी असल्याने माझी मोटार बंद पडली. कामगारांनी मोटार ढकलून पुढे रस्त्याच्याकडेला आणून लावली. मोटारीच्या समोर जेसीबी उभा होता. जेसीबीचा चालक माझ्याशी बोलला व त्यामध्ये जाऊन बसला. मी मोटारीत गेलेले पाणी काढत होतो. तेवढ्यात कडकड असा मोठा आवाज आला. लोक मोठ्याने ओरडले.

जेसीबीच्या ड्रायव्हरने वर पाहिले, तर भले मोठे वडाचे वाळलेले झाड खाली येत होते. त्याने पटकन उडी मारली. जेसीबीच्या सावलीत बसलेले चार कामगार पळाले अन्‌ काही कळायच्या आत झाड जेसीबीवर कोसळले. माझी गाडी जवळच होती. बारीक फांद्या माझ्या गाडीकडेही आल्या. झाडाचा मुख्य भाग कंपाउंडकडे गेल्याने आणि कामगारांनी प्रसंगावधान राखून वेळीच पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला.  अन्यथा कामगार, मी व माझ्या मोटारीत असलेला माझा मुलगा या सर्वांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला असता.

रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठेकेदार वा अधिकारी तिकडे फिरकतही नाहीत. रस्ता उकरताना झाडांची मुळे मोकळी होत आहेत. काही जुनाट वाळलेली झाडे या भागात आहेत.  किमान संभाव्य धोका ओळखून असे अडथळे अगोदरच काढणे आवश्‍यक आहे. पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या जागा बंद आहेत.  त्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साठून वाहतुकीस अडथळे येत आहेत.   एखाद्याचा बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
आज आमचे प्राण वाचले, पण रोजच लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठेकेदार व बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT