रिक्षाचालक अनिल बोराटे
रिक्षाचालक अनिल बोराटे 
पुणे

रिक्षाचालकाने उचलला तंबाखूमुक्तीचा विडा

सकाळवृत्तसेवा

पौड रस्ता - दारूने वडिलांचे आयुष्य संपविले... त्यांच्या व्यसनामुळे शाळा अर्धवटच सोडावी लागली... जे सोसलं, जे पाहिलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी एक विडा उचललाय... तो म्हणजे व्यसनमुक्तीचा. तंबाखू, दारूच्या आहारी गेलेल्यांना त्यापासून परावृत्त करून त्यांचे आयुष्य फुलविण्याचं काम हा अवलिया करतोय.

अनिल बोराटे असे त्यांचे नाव. बोराटे हे कोथरूड गावात राहतात. त्यांच्या वडिलांना दारू व तंबाखूचे व्यसन होते. त्यांच्या व्यसनामुळे घरात सातत्याने कलह व्हायचा. त्यामुळे लहानपणी त्यांच्या मनात व्यसनाविषयी चीड निर्माण झाली. फुले विकून त्यांनी उदरनिर्वाह चालवला. पुढे आणखीन जबाबदाऱ्या खांद्यावर पडल्याने त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरवात केली. यादरम्यान दिवसभरात ते व्यसनाधीन व्यक्तींना याचे दुष्परिणाम सांगतात. सोबत ते सोडविण्यासाठी काय करता येईल याबाबत उपाययोजनाही सुचवतात. आतापर्यंत त्यांनी वीस लोकांची व्यसनातून मोफत मुक्ती केली आहे.  

बोराटे यांच्यामुळे तंबाखूच्या व्यसनापासून परावृत्त झालेले नितीन भगत म्हणाले, की व्यसन सोडणं हे आपल्या हातात आहे. माझ्या मित्राने त्यासाठी सहकार्य केले. एखाद्या औषधाच्या सहकार्याने आपण व्यसनावर ६० टक्के मात करू शकतो. आपली इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. प्रलोभनाला बळी न पडता नकार दिला तर आपण व्यसनी बनणार नाही.

कॅन्सर होण्यासाठी ७५ घटकांची आवश्‍यकता असते. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये यापैकी ४३ प्रकारचे घटक आढळतात. शरीराच्या ४७ भागांमध्ये तंबाखूमुळे कॅन्सर होतो. म्हणूनच आम्ही म्हणतो, की तंबाखूच्या आहारी जाऊ नका.
- हर्शल पंडित, मनोविकारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT