Yashwant Sugar Factory
Yashwant Sugar Factory sakal
पुणे

Yashwant Sugar Factory Election : यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणुकांमध्ये शेतकरी विकास आघाडीचा डंका!

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन, ता. १०: थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी (ता. १०) सकाळपासुन उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात सुरु आहे. या निवडणुकीतील सर्वात पहिला निकाल जाहीर झाला होता. यामध्ये कारखान्याच्या 'ब' वर्गात आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलचे उमेदवार सागर अशोक काळभोर हे २०२ मतांनी विजयी झाले आहेत.

उरुळी कांचन-शिंदवणे या गट क्रमांकात एकमध्ये “शेतकरी विकास आघाडी" चे संतोष आबासाहेब कांचन, सुनिल सुभाष कांचन आणि सुशांत सुनिल दरेकर, हे तीनही उमेदवार विजयी झाले असून संतोष आबासाहेब कांचन यांना सर्वाधिक ५६७० मत् मिळाली आहेत. सुनिल सुभाष कांचन यांना ५४९६ मते, सुशांत सुनिल दरेकर यांना ५०८० एवढी मते मिळाली आहेत. पराभूत उमेदवार विकास विलास आतकिरे यांना ४८६५ ,अजिंक्य महादेव कांचन यांना ४४९७ मते तर अमित भाऊसाहेब कांचन यांना ४१९६ एवढी मते मिळाली आहेत.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सोरतापवाडी, नायगाव व कोरेगावमूळ या गट क्रमांक दोनमधील "शेतकरी विकास आघाडी" चे शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी व ताराचंद साहेबराव कोलते तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. तर रयत सहकारी पॅनेलच्या राजेंद्र रतन चौधरी, मारुती सिताराम चौधरी, लोकेश विलास कानकाटे या तीनही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लोणी काळभोर-थेऊर या गटात "अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी" या पॅनेलचे नवनथ तुकाराम काकडे विजयी झाले आहेत. याच पॅनेलचे उमेदवार अप्पासाहेब रंगनाथ काळभोर व राहुल मधुकर काळभोर या दोघांचा पराभाव झालेला आहे. या निवडणुकीत मोरेश्वर पांडुरंग काळे यांना ५२६८ तर योगेश प्रल्हाद काळभोर यांना ४९५१ मते मिळाली. तर नवनाथ काकडे यांना ५१३१ एवढी मते मिळाली. तर पराभुत उमेदवार अप्पासाहेब रंगनाथ काळभोर यांना ४७९९, राहुल मधुकर काळभोर यांना ४३३० तर अमर काळभोर यांना ४८४२ मते मिळाली.

हडपसर - मांजरी, फुरसुंगी या चार नंबर गटातील “शेतकरी विकास आघाडी”चे उमेदवार अमोल प्रल्हाद हरपळे यांना ५४०८ तर राहुल सुभाष घुले यांना ५५०२ मते मिळाली आहेत. तर पराभुत उमेदवार राजीव शिवाजीराव घुले यांना ४००९ मते तर सुरेश फकीरराव कामठे यांना ४४८० मते मिळाली आहे.

कोलवडी, मांजरी-वाघोली या पाच गटातील शेतकरी विकास आघाडी चे विजयी उमेदवार किशोर शंकर उंद्रे यांना ५११२ तर रामदास सिताराम गायकवाड यांना ५२६२ मते मिळाली. तर पराभुत उमेदवार रोहिदास उंद्रे यांना ५१२० तर आनंदा पवार यांना ४१०० मते मिळाली. दरम्यान गट क्रमांक ६, महिला राखीव, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती आणि विमुक्त /भटक्या जाती गटाची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT