प्राधिकरण - माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नियोजित स्मारक.
प्राधिकरण - माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नियोजित स्मारक. 
पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मारकाचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - निगडी प्राधिकरणामधील पेठ क्र. २७ येथे ४४ गुंठे क्षेत्रफळावर यशवंतरावजी चव्हाण स्मारक समितीतर्फे यशवंतराव चव्हाण यांचे बहुमजली स्मारक बांधण्यात येत असून कित्येक वर्षांपासून पुरेशा निधीअभावी रखडलेल्या स्मारकाच्या बांधकामाला शुक्रवारी (ता. १५) सुरुवात झाली.   

चव्हाण यांच्या जीवनकार्याबद्दल नवीन पिढीला माहिती व्हावी, तसेच त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेण्यासाठी सर्व यशवंत विचारांच्या व्यक्तींनी एकत्र येत १९८९ मध्ये यशवंतरावजी चव्हाण स्मारक समितीची स्थापना केली. समितीचे संस्थापक-अध्यक्ष कै. एन. आर. शिंदे आणि लालासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारक समितीच्या बांधकामाला २०१४ मध्ये सुरूवात झाली. त्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून ४४ गुंठे जागा समितीला देण्यात आली. 

समितीचे अध्यक्ष सुनील जाधव म्हणाले, ‘‘चव्हाण यांनी राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणांमुळेच संपूर्ण राज्यभर छोटे-मोठे उद्योगधंदे, सहकारी साखर कारखाने बॅंका, पतपेढ्या सुरू झाल्या. तसेच लाखो हातांना रोजगार मिळाला. उद्योगधंद्यांना चालना मिळाली. त्यांचे ऋण फेडण्याचे औचित्य मिळावे तसेच भावी पिढीला त्यांच्या कार्यापासून प्रेरणा-स्फूर्ती मिळावी या हेतूने हे स्मारक बांधले जात आहे. या स्मारकाचा खर्च सुमारे २५ कोटी रुपये होणार असून आतापर्यंत बांधकामावर अडीच कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुरूवातीचा काही काळ वगळता आर्थिक निधीअभावी स्मारकाचे काम रेंगाळले होते. परंतु, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या पुढाकारामुळे महापालिकेकडून स्मारकाला पाच कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी दोन कोटी रुपये मिळाले आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेनेही ३५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे कामाला पुन्हा सुरूवात झाली आहे. यापुढेही लोकवर्गणी आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी वस्तू अथवा पैशांच्या स्वरूपात सढळ हस्ते मदत करावी.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT