youth-inspirator-award
youth-inspirator-award 
पुणे

यिन - यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड- 2018

सकाळवृत्तसेवा

पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) युवा व्यासपीठाच्या वतीने सात विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या युवकांना देण्यात येणाऱ्या ‘यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड- २०१८’साठी नामांकन पाठवण्याची अंतिम मुदत येत्या गुरुवारी (ता. १०) संपते आहे. 

अडथळ्यांवर मात करून समाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्या तरुणांचे कौतुक व्हावे आणि अन्य युवकांनाही सकारात्मक कामाची प्रेरणा मिळावी या हेतूने हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

‘यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड- १८’ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जवळपास सर्व जिल्ह्यांमधून या पुरस्कारांसाठी नामांकने येत आहेत. तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी यासाठी ‘यिन’ने महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने हे गौरव होणार आहेत. मुंबई, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव या बारा शहरांमध्ये १६ मे ते १६ जून दरम्यान ही परिषद होणार आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या ॲवॉर्डसाठी निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे मुख्य प्रायोजक आहेत.

‘यिन’तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी दिला जाणारा यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड महाराष्ट्रातील तरुणांमध्ये आत्मविश्वास तसेच आत्मसन्मान वाढवणारा आहे. या पुरस्कारांच्या निमित्ताने राज्यभरातील तरुणांमधील बुद्धिमत्ता, कष्ट व जिद्द पाहायला मिळणार आहे.
- निवेदिता नहार, संचालिका, हॅशटॅग क्‍लोदिंग

महाराष्ट्रातील युवकांच्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार लहरावा, म्हणून तर ‘यिन’ व ‘निलया ग्रुप’ युवक निर्माणाचे आदर्श कार्य करत आहेत. या युवकांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी ‘यिन’सोबत आम्ही युवकांना पुरस्कार देतो आहोत. या सन्मानातून युवकांना आदर्श कार्याची प्रेरणा मिळावी व असंख्य युवांच्या सहभागाने महाराष्ट्राचे कर्तृत्व दाही दिशांमध्ये गर्जावे, हीच सदिच्छा!
- पायल मेहता,  संचालिका, निलया एज्युकेशन ग्रुप, पुणे

पुरस्कारासाठी निकष
 १८ ते ३० वयोगटातील युवक, युवती

नामांकनासोबत ही माहिती पाठवा
 शैक्षणिक कामगिरी, वैयक्तिक यश आणि इतर विशेष कामगिरी 
 कोणती आव्हाने पार केली?
 तुमच्या कामाचा, नवकल्पनांचा समाजाला काय फायदा झाला?
 बातम्यांची कात्रणे, आधी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती व छायाचित्रे 

 अधिक माहितीसाठी संपर्क ः ९०७५००७९५८

या क्षेत्रांतील कामासाठी आहेत पुरस्कार
कम्युनिटी सर्व्हिस, सामाजिक सेवा, कला आणि सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, विज्ञान- तंत्रज्ञान- अभियांत्रिकी, एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप,  उद्योग- स्टार्ट अप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT