Crime News
Crime News sakal
पुणे

Pune News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीने वसतिगृहात संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवार पेठेतील एका वसतिगृहात सोमवारी सकाळी ही घटना घडली. तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अभिलाषा महेंद्र मित्तल (वय २७, रा. गुरुवार पेठ, मूळ रा. जालना) असे युवतीचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर (वय २८) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा एम.एस्सी. उत्तीर्ण असून, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती.

सोमवारी सकाळी वसतिगृहातील खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला. परंतु तिने प्रतिसाद न दिल्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे आढळून आले.

या प्रकरणी वसतिगृह चालक सुनील महानोर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महानोर देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करीत वसतिगृह चालवत होता. तिचा महानोरशी वाद झाला होता. तिच्या हाता-पायावर जखमा झाल्याचे आढळून आले आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT