पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळील अपघातात तरुण ठार

सकाळवृत्तसेवा

महाळुंगे पडवळ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) येथील सहाणेमळ्यानजीक मोटार सायकलला इनोव्हा गाडीची धडक बसली. अपघातात मोटार सायकलस्वार राहुल भीमराव अरबट (वय 35, रा. नयावथोडा ता. मोर्शी जि. अमरावती) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गाडीसह चालक पळून गेला. स्थानिक नागरिक व पत्रकारांच्या सतर्कतेमुळे वाहन चालकाला राजगुरुनगर येथील टोलनाक्‍यावर पकडण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी (ता. 8) सदर घटना घडली.

राहुल अरबट मोटार सायकलहून (एम. एच. 14, जे.जे.6653) पुण्याच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) येथील सहाणेमळ्यानजीक खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करत असताना मोटार सायकलला पाठीमागील बाजूने इनोव्हा (एम. एच. 14, ई एच. 7288) गाडीची धडक बसली. अपघातात राहुल अरबट गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे मंचर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचारापुर्वीच अरबट यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

अपघात घडल्यानंतर इनोव्हा गाडी घेऊन चालक पंकज बाळासाहेब मेमाने (रा. मांजरी फार्म सोलापूर रोड पुणे) पळून गेला. स्थानिक नागरिक व पत्रकारांनी मंचर पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मंचर पोलिसांनी तत्काळ वायरलेसवर मेसेज दिल्याने राजगुरुनगर येथील टोलनाक्‍यावरुन इनोव्हा गाडी व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालकाने अपघात केल्याची कबुली दिली आहे.

मंचर पोलिसांनी इनोव्हा गाडीचा चालक पंकज बाळासाहेब मेमाणे याच्या विरोधात निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अमोल रामभाऊ तिरमारे (वय 35, रा. सानेचौकी मोरवस्ती, चिखली, ता. हवेली) यांनी याबाबत मंचर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास ए. टी. शिंदे करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT