पुणे

अपघातात तरुण ठार; हेल्मेट घालूनही मेंदूचा चेंदामेंदा

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन : पुणे-मुंबई महामार्गावरील केंद्रीय राखीव दलाच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता ओलांडणाऱ्या सीआरपीएफच्या ट्रकला धडकून मागचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (ता.१०) सकाळी पावणेबाराच्या सुमारास झाला. विशेष म्हणजे या तरुणाने हेल्मेट घातले होते. तरीदेखील या अपघातात त्याच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला.

परवेझ इद्रीस खान (४५,मुंब्रा,ठाणे.मुळ गाव आझमगड उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्या मागे बसलेला मित्र इब्राहीम बशीर अन्सारी (३८,रबाळे, नवी मुंबई) हा बचावला. विशेष म्हणजे त्याला किरकोळ दुखापतही झाली नाही. सहा मित्र तीन दुचाकीवर शनिवारी (ता.०९) खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते.

दर्ग्याच्या दर्शनावरुन मुंबईकडे परतत असताना अचानक समोर ट्रक दिसल्याने त्यांनी आपल्या गाडीचा डिस्क ब्रेक दाबला. त्यानंतर दुचाकी घसरुन पडली. मित्र बाजूला पडला आणि परवेझ पुढे फेकला जाऊन ट्रकच्या मागील चाकाखाली आला.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे गुन्हा शाखेचे निरीक्षक नारायण पवार यांनी त्वरीत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजवरुन पुढील तपास चालू असल्याचे पवार यांनी सांगितले. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि सीआरपीएफचा ट्रक पोलिस ठाण्यात आणून लावला.

सीआरपीएफ गेटसमोर यापूर्वीही अनेकवेळा अपघात झाले असून, अनेकांचे बळी गेले आहेत. या अतिधोकादायक छेदरस्त्याच्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची वारंवार मागणी करुनही रस्ते विकास महामंडळ दखल घेत नसल्याचे सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट सचिन गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT