Tohid Shaikh
Tohid Shaikh sakal
पुणे

Pune Crime : बांधकाम व्यावसायिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बांधकाम व्यावसायिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेह कोंढवा पोलिस ठाण्यात आणला. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह न हलविण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर अखेर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

ही घटना कौसरबाग येथील गॅलेक्सी प्रीमिअम इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. तोहीद मेहबूब शेख (वय २६, रा. शालिमार सोसायटी, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पत्नी फबिहा तोहीद शेख (वय २३) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अरबाज महम्मद अली मेमन (वय ३५, रा. कोंढवा) याच्याविरुद्ध सायंकाळी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तोहिद मागील चार वर्षांपासून बिल्डर अरबाज मेमनकडे चालक आणि सुपरवायझर म्हणून नोकरीस होता. तोहिद बुधवारी कामावर गेला नाही. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अरबाजने तोहिदला सासऱ्याच्या घरी बोलावून घेतले.

उचल पैसे घेऊनही कामावर येत नाही, असे म्हणत तोहिदला त्याच्या सासू-सासऱ्यासमोर शिवीगाळ केली. हा अपमान सहन न झाल्याने तोहिदने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आत्महत्येपूर्वी मोबाईलवर बनवला व्हिडिओ

‘गेल्या चार दिवसांपासून आरोपी अरबाज मेमन त्रास देत होता. सासऱ्यासमोर शिवीगाळ करून माझा अपमान केला. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली,’ असे सांगत मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तोहिदने सहाव्या मजल्यावरून उडी मारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT