Congress Party esakal
Punjab Assembly Election 2022

'माझ्या कुटुंबानं पक्षासाठी रक्त सांडलंय, मी कदापि काँग्रेस सोडणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

'जेव्हा एखादा नेता कॉंग्रेस सोडतो, तेव्हा पक्षाचं मोठं नुकसान होत असतं.'

श्री आनंदपूर साहिबचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी (Manish Tiwari) यांनी काँग्रेस (Congress) सोडण्याच्या अटकळांचं खंडन केलंय. काँग्रेस पक्षात आम्ही भाडेकरू नाही, भागीदार आहोत, असं ठणकावून सांगत हे विधान केलंय. आम्ही आमच्या आयुष्यातील 40 वर्षे पक्षासाठी दिली आहेत. आमच्या कुटुंबानं पक्षासाठी रक्तही सांडलंय, असंही ते म्हणाले.

मनीष तिवारी यांनी माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार (Ashwini Kumar) यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. तिवारी म्हणाले, जेव्हा एखादा नेता कॉंग्रेस सोडतो तेव्हा पक्षाचं मोठं नुकसान होत असतं. राज्यसभेतील एक जागा लोकांना खूप काही करायला लावते. मनीष तिवारी यांनी ही बाब गंभीर असल्याचं मान्य केलंय. सेखदी यांनी काँग्रेस सोडली असेल, तर कदाचित त्यामागं काहीतरी राजकारण असेल. कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्याशी त्यांचे वैयक्तिक संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) काँग्रेसनं यावेळी मनीष तिवारी यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केलेला नाही. मनीष तिवारी हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या जवळचे आहेत. हे त्यांनी उघडपणे कबूल केलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिवारी म्हणाले, काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये अशीही नावं आहेत, त्यांच्या सांगण्यावरून त्यांची पत्नीही मतदान करणार नाही, असं तिवारींनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT