लग्नात विघ्न! 10 वेळा फोन करूनही पोहोचली नाही Ambulance

Uttar Pradesh kushinagar Accident
Uttar Pradesh kushinagar Accidentesakal
Summary

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केलाय.

उत्तर प्रदेशातील कुशीनगर (Kushinagar, Uttar Pradesh) येथे बुधवारी रात्री एका लग्नादरम्यान (Marriage Ceremony) हृदयद्रावक घटना घडलीय. या अपघातात 9 मुलींसह 13 जणांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, हळदीच्या कार्यक्रमावेळी सर्व महिला विहिरीच्या (Well) जाळीवर बसून पूजा करत असताना जाळी तुटून सर्व महिला विहिरीत पडल्या. या अपघातानंतर सुमारे दीड तास सरकारी रुग्णवाहिकेला (Government Ambulance) मदतीसाठी फोन करण्यात आला. मात्र, कोणीही मदतीसाठी पोहोचलं नाही, असा आरोप मृत महिला व मुलींच्या कुटुंबीयांनी केलाय. अपघातात ठार झालेल्या मुलींचं वय 5 ते 15 आहे. सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना पीडित कुटुंबीयांनी सांगितलं की, आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी विहिरीतून महिलांना बाहेर काढलं आणि त्यानंतर रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी 13 जणांना मृत घोषित केलं. या सर्वांचा बुडून मृत्यू झालाय. या अपघातानंतर परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. लोक मदतीसाठी इकडं-तिकडं धावत होते. अनेकवेळा रुग्णवाहिकेला बोलविण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, दहा जणांनी वेळोवेळी रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, एकही रुग्णवाहिका मदतीला आली नाही. परिसरात केवळ तीन किलोमीटर अंतरावर रुग्णालय असताना ही स्थिती दिसून आली, त्यामुळं संताप व्यक्त होतोय.

Uttar Pradesh kushinagar Accident
लग्नातला एक विधी ठरला १३ जणांचा काळ

दीड तास रुग्णवाहिकेसाठी फोन करण्यात आला. मात्र, प्रत्येक वेळी बस येत असल्याचं उत्तर आलं. दरम्यान, एकही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही, असा आरोप आहे. पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फोन केल्यानंतर पोलीस मदतीसाठी पोहोचले आणि त्यांच्यातर्फे बचावकार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर अनेक जखमींना पोलिस वाहनातूनच रुग्णालयात नेण्यात आलं. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com