R Thyagarajan News sakal
Business

R Thyagarajan : 6000 कोटी रूपयांची संपत्ती दान करणारे त्यागराजन कोण आहेत? CIBIL न तपासताच त्यांची कंपनी देते कर्ज

R Thyagarajan News : आर. त्यागराजन यांनी तब्बल 6000 कोटी रूपयांची संपत्ती आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ट्रस्टसाठी दान केली. एवढा मोठा निर्णय त्यांनी का घेतला? जाणून घ्या सविस्तर..

सकाळ डिजिटल टीम

R Thyagarajan News :  श्रीराम ग्रुपचे संस्थापक राममूर्ती त्यागराजन यांनी आपली तब्बल 6000 कोटी रूपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. स्वतःसाठी त्यांनी केवळ एक छोटेसे घर आणि जवळपास 4 लाख रूपयांची कार ठेवून उर्वरित सर्व मालमत्ता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्थापित करण्यात आलेल्या ट्रस्टला दान केल्याची घोषणा केली आहे.

86 वर्षीय त्यागराजन यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, ‘मी स्वतःची जवळपास 6000 कोटी रूपयांची मालमत्ता दान केली आहे’. पण ही संपत्ती त्यांनी कधी दान केली, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.   

‘मला लोकांच्या आयुष्यातील वाईट काळ संपवायचा आहे’

एका मुलाखतीत त्यागराजन यांनी सांगितले की, ‘जे लोक संघर्ष करत आहेत, मला त्यांच्या आयुष्यातील त्रास काही प्रमाणात कमी करायचा आहे’. पुढे ते असेही म्हणाले की, 'नियमित उत्पन्न नसलेल्या लोकांनाही कर्ज देणे तितकेसे धोकादायक नाही, जितके ते सामान्यतः मानले जाते; ही बाब सिद्ध करण्यासाठी मी वित्तीय सेवेच्या जीवनात प्रवेश केला'.

श्रीराम ग्रुप क्रेडिट इतिहास न तपासता कर्ज देते

त्यागराजन यांनी सांगितले की, गरिबांना कर्ज देणे हा समाजवादाचा एक भाग आहे. लोकांना कमीत कमी दरात कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी असंही नमूद केलं की, कर्ज देताना आमचा समूह कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर कधीच पाहत नाही. रिपोर्टनुसार श्रीराम ग्रुप कर्ज देण्यापूर्वी ग्राहकांचे CIBIL (Credit Information Bureau (India) Limited) तपासत नाही.

त्यागराजन यांनी 1974 साली सुरू केली होती कंपनी

आर. त्यागराजन हे श्रीराम ग्रुपचे संस्थापक आहेत. त्यांचा जन्म 25 ऑगस्ट 1937 रोजी चेन्नई येथे झाला. एप्रिल 1974 मध्ये त्यांनी श्रीराम ग्रुपची स्थापना केली. यावेळेस त्यांच्यासोबत एव्हीएस राजा आणि टी. जयरामन हे सह-संस्थापक म्हणून या कंपनीत जोडले गेले होते. 

पुढे या कंपनीने कर्ज आणि विमा व्यवसायातही प्रवेश केला. श्रीराम फायनान्स ही भारतातील आघाडीची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. श्रीराम ग्रुप कर्ज आणि विमा संबंधित सेवा ग्राहकांकरिता उपलब्ध करून देतात. वर्ष 2013 मध्ये त्यागराजन यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले होते.

श्रीराम ग्रुपमध्ये एक लाखाहून अधिक लोक आहेत कार्यरत   

श्रीराम ग्रुपमध्ये सध्या 1 लाख 8 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या अन्य कंपन्यांमध्ये श्रीराम फायनान्स, श्रीराम हाउसिंग फायनान्स, श्रीराम जनरल इन्शुरन्स, श्रीराम इनसाइट, श्रीराम फॉर्च्युन, श्रीराम एएमसी, श्रीराम वेल्थ आणि श्रीराम प्रॉपर्टीज अशा कंपन्यांचाही समावेश आहे.

त्यागराजन यांचे म्हणणे आहे की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना मार्केट रेटपेक्षा कमी पगार देतात. कारण त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्याने पैशाच्या बाबतीत आपल्या सभोवतालच्या लोकांशी स्पर्धा करू नये. एक व्यक्ती म्हणून ते योग्य नाही. तुमच्याकडे पुरेसा पैसा असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व गरजा व्यवस्थितपणे पूर्ण करणे शक्य होईल.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT