basic need is health insurance for women
basic need is health insurance for women Sakal
Personal Finance

महिलांसाठी आरोग्य विमा

सकाळ वृत्तसेवा

- सारिका देशपांडे-दिंडोकार

आपल्या देशात आरोग्य विम्याची गरज कोविड महासाथीनंतर अधिक ठळकपणे अधोरखित झाली. याबाबत जागरुकताही वाढली. आरोग्य विमा पुरुष, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असतो.

माझ्या परिचयातील एका महिलेचे उदाहरण बघितल्यानंतर महिलांसाठी आरोग्य विमा किती उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे, हे अधिकच प्रकर्षाने जाणवले. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आरोग्य विम्यातीत गुंतवणुकीचे महत्त्व विशद करण्याचा हा प्रयत्न.

तनयाला वयाची पस्तिशी ओलांडेपर्यंत कोणताही मोठा आजार नव्हता. तिला काही इन्शुरन्स कंपन्यांनी संपर्क केला. मात्र, तेव्हा तिला या आरोग्य विम्याची काय गरज आहे, असे वाटायचे आणि ती त्या कंपन्यांना वाटाण्याच्या अक्षता लावायची. एक दिवस अचानकच तिच्या पोटात दुखू लागल्याने, तिने सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा तिला त्यात काही गाठी आढळून आल्या. डॉक्टरांनी त्वरित ऑपरेशनचा सल्ला दिला, त्यावेळी मात्र तिला आरोग्य विमा न घेऊन आपण मोठी चूक केल्याची जाणीव झाली. आरोग्य विमा नसल्याने ऑपरेशनचा भलामोठा खर्च तिला स्वतःलाच करावा लागणार होता. यामुळे तिला व तिच्या कुटुंबीयांना मोठाच आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागला. हे एक प्रातिनिधीक उदाहरण झाले, अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूलाही पाहायला मिळतात.

आरोग्य विम्याचे महत्त्व

वयाची चाळिशी ओलांडली, की महिलांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. याच टप्प्यावर त्यांना आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावते. स्तनांचा कर्करोग, गर्भधारणेशी संबंधित विकार, अनियमित रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी आणि सांधेदुखी आदी गंभीर आजारांची शक्यता वाढते. अशावेळी उत्तम उपचार घेण्यासाठी महिलांना आरोग्य विमा अत्यंत उपयुक्त ठरतो.

आरोग्य विमा घेताना...

सर्वसमावेशक कव्हरेजः आरोग्य विमा घेताना सर्व आवश्यक तपासण्या करून घेतल्या जातील; त्याचबरोबर सर्व आजारही समाविष्ट करून घेतले जातील. तसेच, क्लेम सेटलमेंट त्वरित उपलब्ध होईल आणि प्रतीक्षा कालावधी (waiting period) कमी असेल, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे असते.

मॅमोग्राम, पॅप स्मिअर यांसारख्या तपासण्या नियमित केल्यामुळे आजारांचे निदान लवकर होण्यात व त्यावर योग्य उपचार करण्यात मदत होईल. हॉस्पिटलमधील खोली भाड्यासाठी (रूम रेंट) मर्यादा नसेल, अशी पॉलिसी निवडा.

प्रसुती आरोग्य विमाः प्रसुतीच्या वेळी, प्रसुतीच्या आधी आणि नंतरच्या चाचण्या व औषधे यांचा समावेश आहे ना, याची खात्री करावी. फर्टिलिटी कव्हर घेताना इनव्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) कव्हर करणारी पॉलिसी असावी.

जुन्या व्याधींसाठी विमाः जुन्या व्याधी, आजार कव्हर करणारी पॉलिसीसुद्धा महिलांना घेता येते. काही कंपन्या जुना आजार असलेल्या महिलांनादेखील आरोग्य विमा प्रदान करतात. मात्र, त्यांना कमीत कमी २ ते ४ वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असतो. विशेषतः कर्करोग, मधुमेह असलेल्या महिलांना

(pre-existing deceases) प्रतीक्षा कालावधी असलेली आरोग्य विमा योजना घेता येते.

चांगल्या रुग्णालयांचा समावेशः पॉलिसी निवडताना त्यात चांगली रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश, रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा आहे ना, याची खात्री करून घ्या.

येत्या महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी स्वतःपासून आरोग्य विमा घेण्याची सुरुवात करावी. स्वतःचा आणि कुटुंबाचाही आरोग्य विमा काढावा, याचा नक्कीच फायदा होतो.

आरोग्य विम्याचे फायदे

१. आरोग्यासाठी नियमित लागणाऱ्या खर्चात कपात करण्याची संधी

२. प्रसूतीच्या वेळेला मिळणारे फायदे

३. गंभीर आजारांमध्ये होणारी आर्थिक मदत

४. करवजावटीचा लाभ घेता येतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० डी अंतर्गत आरोग्य विम्यासाठी करवजावट मिळते.

५. कॅशलेस कव्हर

६. प्रतिबंधात्मक काळजी व पुढील काळात होणाऱ्या खर्चावरही नियंत्रण राहू शकते.

महिलांसाठी काही सर्वोत्तम योजना

१. केअर जॉय

२. स्टार वूमन केअर प्लॅन

३. एचडीएफसी ऑर्गो मेरी स्वास्थ्य महिला सुरक्षा

४. चोलामंडलम सर्व शक्ती योजना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT