Bank Holidays
Bank Holidays  Sakal
Personal Finance

Bank Holiday: बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरातील बँका बंद राहणार? पाहा सुट्ट्यांची यादी

राहुल शेळके

Bank Holiday on Buddha Purnima 2023: उद्या बुद्ध पौर्णिमा (बुद्ध पौर्णिमा 2023) हा सण संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. अशा परिस्थितीत 5 मे 2023 रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर ते आजच पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

चेक जमा करण्यापासून ते डिमांड ड्राफ्ट, पैसे काढणे इत्यादी अनेक कामे बँकेत असतात. अशा स्थितीत बँकेला सुट्टी असताना अनेक महत्त्वाची कामे ठप्प होतात. उद्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक शहरांमध्ये सुट्टी असणार आहे.

उद्या कोणत्या शहरांमध्ये बँका बंद राहणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या सोयीसाठी बँक सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते. बुद्ध पौर्णिमा 2023 निमित्त अनेक शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल.

आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, लखनौ, चंदीगड, डेहराडून, जम्मू काश्मीर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल तर तुमच्या बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आजच पूर्ण करा.

मे महिन्यात एकूण किती दिवस बँका बंद राहतील?

बुद्ध पौर्णिमेशिवाय बँका आणखी 10 दिवस बंद राहतील. शनिवार, रविवार सुट्टी व्यतिरिक्त, त्यात रवींद्रनाथ टागोर जयंती, महाराणा प्रताप जयंती निमित्त बँका बंद राहतील.

  • 7 मे 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

  • 9 मे 2023- रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.

  • 13 मे 2023- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

  • 14 मे 2023- रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी.

  • 16 मे 2023- सिक्कीम राज्य दिनानिमित्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

  • 21 मे 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील.

  • 22 मे 2023- महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शिमल्यात बँकांना सुट्टी असेल.

  • 24 मे 2023 - काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरातील बँका बंद राहतील

  • 27 मे 2023- चौथ्या शनिवारमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.

  • 28 मे 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

बँकेत सुट्टी असली तरी तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग इत्यादी अनेक महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग वापरू शकता. याशिवाय तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT