Budget 2024 No Economic Survey to be presented ahead of interim budget; here is why  Sakal
Personal Finance

Economic Survey: अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर होणार नाही; काय आहे कारण?

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सरकार काही महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा मांडते, जेणेकरून (Lok Sabha Elections 2024) निवडणुका पूर्ण होईपर्यंत कामे करता येतील.

राहुल शेळके

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सरकार काही महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा मांडते, जेणेकरून निवडणुका पूर्ण होईपर्यंत कामे करता येतील. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. यावेळी सरकार देशासमोर आर्थिक सर्वेक्षण मांडणार नाही.

खरं तर, दरवर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सभागृहात मांडला जातो, पण अंतरिम अर्थसंकल्प किंवा व्होट ऑन अकाउंट बजेटच्या बाबतीत तो मांडला जात नाही.

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय?

देशाच्या आर्थिक स्थितीचे वर्णन करण्यासाठी, वित्त मंत्रालय आर्थिक सर्वेक्षण सादर करते. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. भारतातील पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये सादर करण्यात आले होते. तेव्हापासून 1964 पर्यंत देशाचे आर्थिक सर्वेक्षण आणि अर्थसंकल्प एकत्र सादर केला जात होता. (What is an Economic Survey?)

साधारणपणे, आर्थिक पाहणीत मागील अहवालांमध्ये सरकारने निश्चित केलेल्या विकासाचा लेखाजोखा असतो. अहवालात देशातील महागाई, पायाभूत सुविधा, कृषी, परकीय चलन इत्यादींचा तपशील देण्यात येतो.

सरकार यंदा आर्थिक सर्वेक्षण सादर करणार नसले तरी याशिवाय सरकारने 29 जानेवारीला इकॉनॉमी रिव्ह्यू सादर केला आहे. 'द इंडियन इकॉनॉमी: अ रिव्ह्यू' नावाच्या या अहवालात सरकारने गेल्या 10 वर्षांतील विकासाचा तपशील दिला आहे.

हा केवळ आर्थिक अहवाल आहे, आर्थिक सर्वेक्षण नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या अहवालात पुढील 3 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT