व्यवसायवृद्धीसाठी डिजिटायझेशनला प्राधान्य
व्यवसायवृद्धीसाठी डिजिटायझेशनला प्राधान्य Sakal
Personal Finance

Digitization : व्यवसायवृद्धीसाठी डिजिटायझेशनला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील महिला उद्योजक डिजिटायझेशनला लक्षणीय महत्त्व देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘गोडॅडी’च्या वतीने करण्यात आलेल्या जागतिक उद्योजकता सर्वेक्षणानुसार, ९७ टक्के महिला उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायात डिजिटलायझेशनमुळे कार्यपद्धतीत मोठी सुधारणा झाल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे, भारतात सर्वेक्षणात सहभागी महिलांपैकी ५१ टक्के या युवा उद्योजिका आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा व्यवसायाला फायदा होईल, असे मत ८८ टक्के महिला उद्योजकांनी व्यक्त केले. भारतातील उद्योजकतेच्या

भविष्याला नवा चेहरा देण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, असे त्यांचे मत आहे. ८२ टक्के महिलांनी येत्या तीन ते पाच वर्षांत व्यवसायवृद्धीची अपेक्षा व्यक्त केली असून, ५७ टक्के महिलांनी विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचा मानस व्यक्त केला.

४७ टक्के उद्योजकांनी ग्राहकांसोबतचे संबंध दृढ करण्यावर लक्ष देणार असल्याचे सांगितले, तर ३८ टक्के महिलांनी सायबर सुरक्षा आणि डेटा सुरक्षा याबाबत उपाययोजना वाढवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे लघुउद्योग क्षेत्राचे स्वरूप बदलत आहे. लघुउद्योग करणाऱ्या महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन क्षेत्रातही यश मिळवता यावे, यासाठी त्यांना सहज वापरता येतील अशी डिजिटल साधने उपलब्ध करण्यावर आमचा भर आहे.

- सेलिना बायबर, उपाध्यक्ष, ‘गो-डॅडी’च्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT