AIS App Sakal
Personal Finance

करभान : करदात्यांसाठी ‘एआयएस’ अॅप

सध्या देशात मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने ही माहिती पाहण्याची सुविधा देणारे ‘एआयएस’ हे अॅप दाखल करण्यात आले आहे.

डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट

सध्या देशात मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने ही माहिती पाहण्याची सुविधा देणारे ‘एआयएस’ हे अॅप दाखल करण्यात आले आहे.

प्राप्तिकर विभागाने करदात्यांना त्यांची जी माहिती प्राप्तिकर विभागाला ज्ञात आहे ती सर्व माहिती संकलित करून ‘वार्षिक माहिती विवरणपत्रात’ (एआयएस) समाविष्ट करून विभागाकडे असलेल्या करदात्यांच्या खात्यात पुरविली आहे. यात करदात्यास सर्व स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती व त्यावर किती करकपात झाली आहे, याचा तपशील असतो. ही माहिती कधी करदात्याच्या विस्मरणात जाऊ शकते, तथापि प्राप्तिकर विभागास त्या माहितीचा विसर पडत नाही. ही अचूक माहिती करदात्याला ऑनलाइन पाहता येते.

मात्र त्यासाठी थोडे माहिती तंत्रज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. सध्या देशात मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने ही माहिती पाहण्याची सुविधा देणारे ‘एआयएस’ हे अॅप दाखल करण्यात आले आहे. करदात्याला एआयएस किंवा टीआयएसची सर्वसमावेशक माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मोबाईलवर ही माहिती उपलब्ध झाल्याने करदात्यांना स्वतः ती तपासता येईल व त्यावर आवश्यकता असल्यास कारवाई करता येईल.

प्राप्तिकर विभागाने अधिकृत निवेदनात असे स्पष्ट केले आहे, की ‘हा एक चांगला उपक्रम आहे. यामुळे करदात्यांना दिलेल्या सेवांसुविधांचे पालन करणे सुलभ होईल.’ नवे ‘एआयएस’ अॅप वापरून, करदाते टीडीएस/टीसीएस, व्याज, लाभांश, शेअर व्यवहार, कर भरणे, जीएसटी डेटा, परदेशी रेमिटन्स आणि करपरतावा आदी संबंधित माहिती सहजपणे पाहू शकतात, तर त्या माहितीबद्दल अभिप्राय प्रदान करण्यासही अनुमती देण्याची तरतूद आहे.

अॅप कसे डाउनलोड करावे?

‘एआयएस’ हे अॅप ‘गुगल प्ले’ किंवा ‘अॅपल अॅप स्टोअर’वर मोफत उपलब्ध आहे. तेथून ते डाउनलोड केल्यानंतर सर्व माहिती पाहण्यासाठी अॅपमध्ये करदात्याला ओळख पटविण्यासाठी नोंदणी करावी लागेल. त्यासाठी ‘नोंदणी करा’ या बटणावर टॅप केल्यानंतर आलेल्या फील्डमध्ये पॅन व जन्मतारीख लिहून, ‘सुरू ठेवा’ बटणावर क्लिक केले पाहिजे. त्यानंतर करदात्याचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेलवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) पाठवले जातील. ते प्रविष्ट केल्यानंतर मोबाईल अॅपमध्ये प्रवेश करण्यासाठी चार-अंकी मोबाईल पिन ठरविण्यास सांगितले जाईल. त्याप्रमाणे चार अंकी पिन ठरवून क्लिक केल्यास हे अॅप कार्यरत होईल.

अॅपचे फायदे

1) करदात्यांना संपूर्ण माहिती जलदरित्या प्रदान करणे शक्य होईल, तर ऑनलाइन फीडबॅक प्रदान करण्याची त्वरीत संधी मिळेल.

2) ऐच्छिक अनुपालनास प्रोत्साहन देणे शक्य होईल आणि प्राप्तिकर विवरणपत्र सुलभपणे भरण्यास सक्षम करता येईल.

3) नवे अॅप महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरले आहे, कारण एक एप्रिलपासून आगामी नवे आर्थिक वर्षापासून, ‘फॉर्म २६ एस’मध्ये फक्त स्रोतावर करवजावट (टीडीएस) आणि स्रोतावरील करसंकलन (टीसीएस) संबंधित डेटा प्रदर्शित केला जाईल.

4) पूर्वी करदाते वर्षातून एकदा त्यांच्या उत्पन्नाचा तपशील देत असत आणि त्यानंतर सरकार निवडक आधारावर तपासत असे, की करदात्यासाठी त्यांचे नियोक्ते, बँका यांसारख्या इतर प्राधिकरणांनी दाखल केलेली माहिती आणि प्रत्यक्षात असणारी माहिती यांच्यात काही विसंगती आहे का? आता कधीही ही माहिती तपासता येणार आहे.

5) या अॅपमुळे विभागातर्फे अपलोड केल्या जाणाऱ्या चुकीच्या, डुप्लिकेट माहितीवर आधारित करविभागाकडून दिल्या जाणाऱ्या अनावश्यक नोटीसा कमी करण्यात मदत होईल.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट-सीए आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT