Dream Folks sakal
Personal Finance

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. ४६२)

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस ही कंपनी विमानतळांवरील प्रवाशांना लाउंज सेवा; तसेच विविध प्रवासी सुविधांची जागतिक स्तरावरील सेवा पुरवते.

भूषण गोडबोले godbolebhushan19@gmail.com

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस ही कंपनी विमानतळांवरील प्रवाशांना लाउंज सेवा; तसेच विविध प्रवासी सुविधांची जागतिक स्तरावरील सेवा पुरवते. कंपनीने बँका, कार्ड नेटवर्क, विमान कंपन्या; तसेच इतर संस्थांसोबत भागीदारी केली असून, कंपनी प्रवाशांना विमानतळावर आरामदायी आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी कार्यरत आहे.

भारतातील बँकांनी वितरित केलेल्या डेबिट आणि क्रेडिट प्रोग्रामसाठी लाउंज सुविधा पुरवणारी ही प्रमुख कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे एक कोटींहून अधिक प्रवाशांनी लाउंज सेवा घेतली. जागतिक स्तरावर १०० पेक्षा अधिक देशांमध्ये कंपनीने आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. कंपनीने सुमारे ३००० पेक्षा जास्त टचपॉइंट (सेवांशी संबंधित ठिकाणे) तयार केले आहेत. गुंतविलेल्या भांडवलावर २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत ही कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे.

गेल्या तिमाहीत, कंपनीने ३२१ कोटी रुपयांचे उत्पन्न व १७ कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे, ज्यामध्ये सुमारे ३० टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून येत आहे. कंपनीने लाउंज सेवांव्यतिरिक्त विमानतळांवरील इतर सुविधांमध्येही प्रगती केली असून, ऑनलाइन डॉक्टर सल्ला, औषध वितरण, स्पा सेवा, गोल्फ कोर्स प्रवेश आदी अनेक सुविधा समाविष्ट आहेत, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी होत आहे. कंपनीने सहा नवे भारतीय विमानतळ लाउंज व ४१ आंतरराष्ट्रीय लाउंज समाविष्ट केले आहेत.

कंपनीने सप्टेंबर महिन्यात ‘हायवे डायनिंग’ हा एक नवा उपक्रम सुरू केला. ही सेवा देशभरातील ६० पेक्षा अधिक प्रमुख महामार्गांवरील (हायवे) लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असेल. प्रवाशांना चांगल्या भोजनाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने कंपनीने ही सेवा सुरू केली आहे, यात दिल्लीतून मुंबई, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकत्यासारख्या प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या महामार्गांचा समावेश आहे.

कंपनीने प्रवाशांना उत्तम अनुभव देण्यासाठी प्रवास व जीवनशैली सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे. या उपक्रमामुळे कंपनी विमानतळ आणि रेल्वे स्टेशनपर्यंत मर्यादित न राहता रस्तामार्गाने प्रवास करणाऱ्यांनादेखील उत्तम सेवा देऊ शकेल, असे कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका लिबरेथा कल्लाट यांनी म्हटले आहे.

कंपनीचा विमानतळ लाउंज, प्रवास; तसेच जीवनशैली सेवा क्षेत्रातील विस्तार, नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याचे उद्दिष्ट, वाढत्या ग्राहक गरजांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण पाहता, जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर - या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT