Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sakal
Personal Finance

Maharashtra Budget 2023 : महाबजेट पहिल्यांदाच हायटेक! फडणवीसांनी निर्मला सीतारामन यांचा कित्ता गिरवला

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget 2023: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला. यंदा राज्यात अर्थसंकल्प सादरीकरणाची एक नवी पद्धत त्यांनी आणली आहे.

यंदा पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प हा आयपॅडवर वाचला गेला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नवी प्रथा सुरू केली आहे. यापूर्वी कागदावरच बजेट सादर करण्यात येत होतं. मात्र यंदाच्या वर्षी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचा आदर्श घेत डिजिटल वाट निवडली आहे.

काही दिवसांपूर्वी सादर झालेलं केंद्र सरकारचं बजेटही यंदा डिजिटली सादर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ वर्षीचं बजेट हे डिजिटल टॅब्लेटच्या साहाय्याने सादर केलं. गेल्या सलग दोन वर्षी केंद्रामध्ये अर्थसंकल्प हा पेपरलेस पद्धतीने सादर होत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०१९मध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पारंपरिक पद्धतीला छेद दिला. आणि अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अनेक वर्षांपासूनची, अगदी ब्रिटीश काळापासूनची परंपरा २०१९ साली मोडली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात या परंपरेला छेद दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT