pan and aadhaar link income tax investment
pan and aadhaar link income tax investment esakal
Personal Finance

पॅन आणि आधार दिलात का?

सकाळ वृत्तसेवा

अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनांसाठी गुंतवणूकदारांना पॅन व आधार अनिवार्य केले आहे. ज्यांनी अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, त्यांनी आपला आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक संबंधित खात्याशी जोडला असल्याची खात्री करणे आवश्‍यक आहे. यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ही खाती गोठविली जाऊ शकतात.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, महिला सन्मान बचत पत्र,

पोस्ट ऑफिसातील विविध मुदतीच्या ठेवी किंवा इतर पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक असणाऱ्या करदात्याने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत नोंदवल्याची खात्री करावी लागेल. या तारखेपर्यंत आधार क्रमांक दाखल केला नाही, तर अल्पबचत योजनांतील गुंतवणूक गोठविली जाणार आहे.

काय होतील परिणाम?

ठेवीदाराने आधीच खाते उघडले असेल आणि त्याचा आधार क्रमांक लेखा कार्यालयात जमा केला नसेल, तर तो ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दाखल करणे बंधनकारक आहे; अन्यथा गुंतवणूक गोठविली जाईल. त्याचे पुढील परिणाम होऊ शकतील.

अ. गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात व्याज जमा केले जाणार नाही.

ब. एखादी व्यक्ती त्याच्या पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही अल्पबचत योजनांत पैसे जमा करू शकणार नाही.

क. मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार नाही.

ड. खाते एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता येणार नाही.

इ. खात्यावर कर्ज मिळणार नाही वा मुदतपूर्तीनंतर पूर्णतः किंवा अंशतः रक्कम काढता येणार नाही, की खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही.

फ. प्राप्तिकर विभाग अशा गुंतवणुकीकडे साशंक नजरेने बघू शकेल.

ग. तातडीच्या वेळी हे पैसे उपयोगी पडू शकणार नाहीत.

ह. कायम खाते क्रमांकावरील कोणतेही अल्पबचत योजनेचे खाते पडताळणी होईपर्यंत हाताळता येणार नाही.

कारवाईमागची भूमिका

देशभरात ६१ कोटींहून अधिक पॅन कार्डधारक आहेत. त्यातील ५१ कोटींहून अधिक पॅन कार्डधारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न केला आहे. तथापि अजूनही १० कोटी पॅनधारकांनी आधार क्रमांकाशी जुळवणी केलेली नाही, असेही निदर्शनास आले आहे, की अनेक वापरात नसलेले पॅन; तसेच आधारशीही संलग्न नसलेल्या अनेक पॅन क्रमांकाशी निगडित असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अल्पबचत योजनेत गुंतवणूक केलेली आहे.

अशा व्यक्ती प्राप्तिकर विवरणपत्रही भरत नाहीत व त्यांचे पत्तेदेखील अपूर्ण आहेत. काही ठिकाणी अस्तित्वात नसलेले पॅन क्रमांक देऊन गुंतवणूक झालेली आहे. यात क्रमांक लिहिताना चुकला असण्याची शक्यताही आहे.

काही ठिकाणी चुकीचा पत्ता देण्यात आला आहे व आता त्या व्यक्ती सापडत नाहीत. अशा एक वा अनेक त्रुटींमुळे मेटाकुटीस आलेल्या प्राप्तिकर विभागाने केंद्र सरकारद्वारे अधिसूचना काढून चुकीच्या पद्धतीने पॅनचा वापर करणाऱ्या व्यक्ती शोधून काढण्यासाठी हा फतवा काढला असून, आता पॅनबरोबर आधार क्रमांक जोडावा लागणार आहे.

काय केले पाहिजे?

अल्पबचत योजनेच्या खातेदारांनी गोंधळून न जाता ताबडतोब बँकेत वा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधार क्रमांक व पॅन तुमच्या गुंतवणूक खात्यात नोंदविला आहे, की नाही याची खात्री करावी; जेणेकरून ३० सप्टेंबरनंतर खाते गोठविले जाणार नाही. खाते गोठविणे म्हणजे खाते जप्ती नसून, वर सांगितल्याप्रमाणे त्यातील आर्थिक व्यवहारांवर बंधने आणणे होय.

शेवटच्या तारखेपर्यंत हे जमले नाही व खाते गोठविले गेले, तरी हे दोन क्रमांक देऊन खाते पुन्हा नियमित करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काही संभाव्य धोके असले, तरी सर्वसामान्य गुंतवणूकदारास हे दोन्ही क्रमांक ३० सप्टेंबर २०२३च्या आत बँक व पोस्ट ऑफिसला दिल्यास काहीच आर्थिक तोटा होणार नाही, हे नक्की !

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT