Patanjali enters race with all-cash offer of rs 830 crore to acquire Rolta India
Patanjali enters race with all-cash offer of rs 830 crore to acquire Rolta India  Sakal
Personal Finance

Patanjali Ayurved: बाबा रामदेव कर्जबाजारी कंपनी खरेदी करणार? दिली 830 कोटी रुपयांची ऑफर

राहुल शेळके

Patanjali Ayurved: बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी कर्जबाजारी कंपनी रोल्टा इंडिया ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. रिपोर्टनुसार, पतंजली आयुर्वेदाने 830 कोटी रुपयांची कॅश ऑफर दिली आहे.

पतंजली आयुर्वेदाने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ला आपली ऑफर समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर एनसीएलटीने एक समिती स्थापन केली आहे. पतंजलीची बोली प्रक्रियेत समाविष्ट करायची की नाही हे ठरवेल. असे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने दिले आहे.

कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली

रोल्टा इंडियाने 1400 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्याने आता कर्जाची परतफेड करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर जानेवारी 2023 मध्ये कंपनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली.

रोल्टा इंडिया कंपनी काय करते?

रोल्टा इंडिया ही आयटी कंपनी आहे. कंपनी संरक्षण, उर्जा, आर्थिक सेवा, उत्पादन, किरकोळ आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये सेवा पुरवते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 1000 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या कालावधीत कंपनीचा महसूल केवळ 38 कोटी रुपये होता.

रोल्टा इंडियाने युनियन बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाकडून 7100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. तसेच सिटीग्रुपच्या नेतृत्वाखालील बँकांकडून 6699 कोटी रुपये असुरक्षित पैसे घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा! या सर्वांवर मिळून होतं सुमारे ४८ लाखांचं बक्षीस

T20 World Cup: टीम इंडियाची बार्बाडोसच्या बीचवर दंगा मस्ती; विराट अन् रिंकू तर...; पाहा Video

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

Ravindra Waikar : वायकरांच्या मतदारसंघात खरंच निकाल बदलला का? मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं? कीर्तिकरांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT