Indian Share Market
Indian Share Market  sakal
Personal Finance

Indian Share Market : निर्देशांकांचा ऐतिहासिक उच्चांक ; ‘सेन्सेक्स’ ७४ हजारांपार, ‘निफ्टी’ २२,४७४ वर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागतिक शेअर बाजारातील संमिश्र वातावरणातही देशांतर्गत खरेदीच्या बळावर आज भारतीय शेअर बाजार कालच्या घसरणीला मागे टाकून तेजीच्या वारूवर स्वार झाला आणि दोन्ही निर्देशांकांनी नवा उच्चांक गाठला. बँकिंग, आयटी क्षेत्रातील लार्ज-कॅप शेअरची जोरदार खरेदी झाल्याने आज बाजारात तेजी परतली.

दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ४०८.८६ अंशांनी वधारून ७४,०८५.९९ या नव्या सार्वकालिक उच्चांकावर, तर ‘निफ्टी’ ११७ अंशांनी वाढून २२,४७४ अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकावर स्थिरावला. देशभरात सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजत आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात रोज वेगवान चढ-उतार दिसत आहेत. आयटी, खासगी बँका आणि औषधनिर्माण क्षेत्रातील शेअरची खरेदी आणि युरोपियन बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी आली, असे विश्लेषकांनी सांगितले.

दिवसभरात ‘सेन्सेक्स’ने ४७४ अंशांची वाढ नोंदवत, ७४,१५१ या उच्चांकालाही स्पर्श केला होता, त्यानंतर तो तिथून खाली आला आणि दिवसअखेर ७४,०८५.९९ वर स्थिरावला. ‘सेन्सेक्स’वरील कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँकेचा शेअर सर्वाधिक २.४७ टक्क्यांनी वाढला. ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन आणि टीसीएसचे शेअर वधारले. अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रिड आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरण झाली.

जागतिक संकेतांचा मागोवा घेताना सुरुवातीच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरणीचा कल होता. तथापि, बँकिंग, आयटी, एफएमसीजी, फार्मा क्षेत्रातील शेअरची मागणी वाढल्याने दिवसअखेर निर्देशांकांनी लक्षणीय झेप घेतली.

-अजित मिश्रा,

वरिष्ठ उपाध्यक्ष, रेलिगेअर ब्रोकिंग

ठळक घडामोडी

  • ‘जेएम फायनान्शिअल’च्या शेअरमध्ये ११ टक्के घट

  • ‘आयआयएफएल लि.’चा शेअर २० टक्क्यांनी घसरून ३८२ रुपयांवर

  • ‘सन फार्मा’चा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर, १६०३ रुपयांवर बंद

  • सोल, टोकियो, शांघाय बाजारात घसरण, हाँगकाँग बाजार तेजीत.

  • युरोपीय शेअर बाजार तेजीत, मंगळवारी अमेरिकेच्या बाजारात घसरण

  • कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८२.५९ डॉलरवर

  • परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मंगळवारी ५७४ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: ठाण्यात नौपाडामधील ईव्हीएम मशीन बंद, मतदार संतापले

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT