Top 10 Richest People In India
Top 10 Richest People In India 
Personal Finance

Top 10 Richest People In India : 'हे' आहेत देशातील कुबेर! टॉप-१० श्रीमंतांमध्ये अदानी-अंबानी कितव्या क्रमांकावर?

रोहित कणसे

Top 10 Richest People In India : भारतातील सर्वात श्रीमंत १० लोक कोण आहेत तुम्हालाम माहिती आहे का? देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसोबत अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये देखील मोठी वाढ पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर Forbes 2024 World's Billionaries List मध्ये या वर्षी रेकॉर्ड १८६ भारतीयांची नावे देखील आहेत. मागच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ही संख्या १६९ इतकी होती. या यादीत देशातील सर्वात मोठे दोन उद्योजक अदानी आणि अंबानी यांनी आपलं स्थान राखलं आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे. टाप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी, शिव नाडर यांचा देखील समावेश आहे, आज आपण फोर्ब्स रिअल टाईम बिलेनीयर्स लिस्टमध्ये सध्या देशातील सर्वात श्रीमंत लोक कोण आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.

१) मुकेश अंबानी सध्या भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इतकंच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते ९व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबनी यांची नेट वर्थ ११७.५ बिलियन डॉलर आहे.

२) अदानी ग्रुपचे चेअरमन ८४.८ बिलियन डॉलर नेट वर्थचे मालक आहेत. तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील १७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

३) HCL Technologies चे मालक शिव नाडर यांची नेट वर्थ ३६.७ बिलियन डॉलक आहे. ते भारतातील तिसरे आणि जगातील ४२ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

४) JSW Group च्या मालक असलेल्या सावित्री जिंदल अँड फॅमिली भारतातील चौथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेटवर्थ ३१.५ बिलियन डॉलर्स आहे. तर जगातील श्रीमंतांमध्ये त्या ५०व्या क्रमांकावर आहेत.

५) Sun PharmaCeutical Industries Ltd चे चेअरमन दिलीप सांघवी भारतातील ५वे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेट वर्थ २५.८ बिलियन डॉलर आहे. देशातील पहली फार्मा कंपनीचे मालक दिली जगातील ७१वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

६) सायरस पुनावाला भारताचे सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, Serum Institute Of India चे मालग सायरस यांची नेट वर्थ २१.८ बिलियन डॉलर आहे. तर ते जगातील ९० क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

७) कुशाल पाल सिंह DLF लिमिटेडचे मालक आहेत आणि देशातील सातव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेट वर्थ २१.३ बिलियन डॉलर आहे तसेच ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ९०व्या क्रमांकावर आहेत.

८) कुमार मंगलम बिर्ला देशातील ८व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेट वर्थ १७.२ बिलियन डॉलर आहे. आदित्य बिरला ग्रुप चे मालक जगातील ९६वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

९) Dmart, Avenue Supermarts चे मालक राधाकृष्णन दमानी भारतातील नवव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांची नेट वर्थ १७.२ बिलियन डॉलर आहे. ते जगातील १०३वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

१०) १० व्या क्रमांकावर ArcelorMittal चे मालक लक्ष्मी मितल आहेत. १६.४ बिलियन डॉलर नेट वर्थ असलेले मित्तल यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये १०७ वा क्रमांक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT