TATA TCS
TATA TCS Sakal
Personal Finance

TCS: टाटांच्या कंपनीतून महिला कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्यास केली सुरुवात; काय आहे कारण?

राहुल शेळके

TCS WFH: देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. टीसीएसचे मुख्य एचआर अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, घरून काम करण्याचा पर्याय बंद केल्यानंतर टीसीएसच्या महिला कर्मचाऱ्यांनी घाईघाईने राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील महिला कर्मचार्‍यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे, परंतु यावेळी हा दर अचानक वाढला आहे.

देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS मध्ये 6 लाखापेक्षा जास्त लोक काम करतात, ज्यापैकी 35% महिला आहेत.

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये, घरून काम करण्याचा पर्याय बंद केल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

यानंतर वर्क फ्रॉम-होम सुविधा बंद केल्याने घरातून काम करण्यावर परिणाम होऊ शकतो का, अशी चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

TCS चे चीफ HR ऑफिसर म्हणतात की कोरोना संकट आणि त्यानंतर घरातून कामाच्या सुविधेमुळे महिलांच्या कामकाजात खूप सहजता आली. घरी काम केल्यामुळे अनेक महिलांना कामावर परत येताना अडचणी येत आहेत.

कोरोना संकटाच्या वेळी घरून काम करण्याची सुविधा मिळाल्यामुळे महिलांना खूप आराम मिळाला होता. घरातील कामे सांभाळणे, मुले व कुटुंबाची काळजी घेणे यासोबतच त्या ऑफिसच्या कामात सहभागी होत होत्या.

आता घरून काम करण्याची पद्धत बंद केली आहे आणि TCS कर्मचार्‍यांना कार्यालयात परत येण्यास सांगितले आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने महिला नोकरीचा राजीनामा देत आहेत.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपल्या कार्यालयीन कार्यबलामध्ये लैंगिक वैविध्यतेनुसार महिलांना प्राधान्य देते. टीसीएसचे एचआर म्हणाले की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस महिलांनी नोकरी सोडण्याचे कारणावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे.

TCS ने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात अॅट्रिशन रेटबद्दल माहिती दिलेली नाही, परंतु गेल्या आर्थिक वर्षात TCS कर्मचाऱ्यांचा अॅट्रिशन रेट 20% पेक्षा जास्त झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT