Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Today: अर्थसंकल्पापूर्वी कसा असेल शेअर बाजार? कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक कराल?

Share Market Investment Tips (Top Shares): 23 जुलैला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या आधी संपूर्ण बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. या अर्थसंकल्पपूर्वी सावधगिरी बाळगल्याने जोरदार प्रॉफिट बुकिंगही झाली. त्यामुळे शुक्रवारी सर्व महत्त्वाचे इंडेक्स लाल रंगात बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: 23 जुलैला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या आधी संपूर्ण बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. या अर्थसंकल्पपूर्वी सावधगिरी बाळगल्याने जोरदार प्रॉफिट बुकिंगही झाली. त्यामुळे शुक्रवारी सर्व महत्त्वाचे इंडेक्स लाल रंगात बंद झाले.

व्यवहाराच्या सत्राअखेर सेन्सेक्स 755.48 अंकांच्या अर्थात 0.93 टक्क्यांच्या घसरणीसह 80,587.98 वर बंद झाला आणि निफ्टी 275.20 अंकांच्या म्हणजेच 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 24,525.60 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमजोर जागतिक संकेत आणि अमेरिका-चीन व्यापार तणावाच्या भीतीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरल्याचे स्टॉक्सबॉक्सचे अवधूत बागकर म्हणाले. विक्रमी उच्चांकावर उघडूनही, निफ्टी आणि सेन्सेक्स लागलीच लाल रंगात घसरले आणि त्यानंतरच्या सत्रात झपाट्याने घसरले.

भारताच्या बेंचमार्क इंडेक्सने शुक्रवारी सलग चौथ्या सत्रात नवीन विक्रमी उच्चांक गाठला. पण नंतर त्यात घसरण झाली. मेटल, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेज आणि एनर्जी या सेक्टर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ब्रोकरेज स्टॉकमध्ये घसरण झाली कारण मायक्रोसॉफ्टच्या आउटेजमुळे कामकाजावर परिणाम झाला.

विशेष बाब म्हणजे मोठे करेक्शन आणि बाजारातील प्रतिकूल परिस्थिती असूनही निफ्टी आदल्या दिवशीच्या नीचांकी पातळीच्या खाली गेलेला नाही आणि 24500 च्या पातळीच्या वर बंद करून तेजी दाखवली आहे. त्याची तेजी टिकवून ठेवण्यासाठी, निफ्टीचा 24500-24200 वर असलेला आधार सपोर्ट ठेवावा लागेल. हा सपोर्ट तुटल्यास घसरण वाढू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • बीपीसीएल (BPCL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • ओएनजीसी (ONGC)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT