Mining stock GOCL Corp hits record high after Coal India order worth rs 766 crore  Sakal
Share Market

GOCL Corporation: कोल इंडियाकडून मिळाली मोठी ऑर्डर अन् जीओसीएलचे शेअर्स भिडले गगनाला

GOCL Corporation: गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 43 टक्क्यांची वाढ झाली आहे.

राहुल शेळके

GOCL Corporation: जीओसीएल कॉर्पोरेशनला (GOCL Corporation) स्फोटकांच्या पुरवठ्यासाठी सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेडकडून (CIL) 766 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. खाण क्षेत्रात स्फोट घडवण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जातो.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही ऑर्डर ऑक्टोबर 2023 ते ऑक्टोबर 2025 या दोन वर्षांत पूर्ण होईल. गेल्या शुक्रवारी जीओसीएल कॉर्पोरेशनचे शेअर्स 0.64 टक्क्यांनी वाढून 602 रुपयांवर बंद झाले.

जीओसीएल कॉर्पोरेशन खाण पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही साहित्य पुरवते. कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील कोल इंडिया ही देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे.

यापूर्वी जून 2023 मध्येही हिंदुजा ग्रुप कंपनी जीओसीएल कॉर्पोरेशनला कोल इंडियाकडून 257 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर दोन वर्षांसाठी (जून 2023 ते मे 2025) डिटोनेटर्स, ऍक्सेसरीज आणि काडतूस स्फोटकांच्या पुरवठ्यासाठी आहे.

जीओसीएल कॉर्पोरेशन हा मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने कमी काळात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 43 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत त्याने 86 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे.

या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 62 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांनी 126 टक्के नफा कमावला आहे. त्याच वेळी, गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 245 टक्क्यांचा दमदार नफा मिळाला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT