Multibagger Stock sakal
Share Market

Multibagger Stock : गुंतवणूकदार झाले मालमाल! 'या' एंटरटेन्मेंट स्टॉकने 5 वर्षात दिला दमदार परतावा

शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. हे मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांना कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा देतात. अशा शेअर्समध्ये एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीशी संबंधित स्टॉकचाही समावेश आहे, ज्यामध्ये गेल्या पाच वर्षांत मजबूत वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. हे मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांना कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा देतात. अशा शेअर्समध्ये एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीशी संबंधित स्टॉकचाही समावेश आहे, ज्यामध्ये गेल्या पाच वर्षांत मजबूत वाढ झाली आहे. या स्टॉकमध्ये थिंकिंक पिक्चर्सचा (Thinkink Picturez) समावेशआहे. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या पाच वर्षांत 272 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2019 रोजी थिंकिंक पिक्चर्सच्या शेअरची किंमत सुमारे 23 रुपये होती. यानंतर शेअर घसरला आणि शेअरची किंमत 10 रुपयांपर्यंत पोहोचली, पण कोविडच्या काळात लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळू लागताच या कंपनीच्या शेअरमध्येही वाढ झाली. त्याची 52 आठवड्यांची उच्चांक 118.95 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांक 62.91 रुपये आहे. सध्या हा शेअर 86 रुपयांवर ट्रेड करत आहे.

नुकतेच थिंकिंक पिक्चर्सने परदेशातही आपला व्यवसाय वाढवला आहे. कंपनीने युएईमध्ये व्हीएफएक्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म कंपनी स्थापन केली आहे. कंपनीकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत, त्यावरही काम सुरू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने अनेक नवीन प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती.

आजच्या बदलत्या काळात लोक ओटीटीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत, थिंकिंक पिक्चर्सचे एमडी विमल कुमार लाहोटी म्हणतात की युएईमध्ये व्हीएफएक्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म कंपनी लॉन्च केल्याने जागतिक प्रेक्षकांना जागतिक दर्जाची मनोरंजन सेवा उपलब्ध होईल. तसेच, यामुळे लोकांना एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव मिळेल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT