Share Market
Share Market  Sakal
Share Market

Share Market : शुगर स्टॉक्समध्ये 40% घसरण, जाणून घ्या का कमी झाला गोडवा?

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : गेल्या काही दिवसांत शुगर स्टॉक्सवर दबाव दिसून येत आहे. अनेक साखरेचे स्टॉक्स त्यांच्या उच्चांकी किंमतीपासून अर्ध्यावर आलेत.

कमकुवत तिमाही निकाल आणि स्वस्त साखरेमुळे शेअर्स दबावाखाली आल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारी मवाना शुगर्सचे स्टॉक्स 1.35 टक्के, राणा शुगर 0.44 टक्के, अवध शुगर 2 टक्के, श्री रेणुका शुगर 1.04 टक्के, द्वारिकेश शुगर 0.73 टक्क्यांनी घसरले.

ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत साखर क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे निकाल कमजोर असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे साखरेच्या स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यासोबतच साखर विक्रीतही मंदी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

याशिवाय फेब्रुवारीमध्ये साखर 5 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. त्याचबरोबर उत्पादन पाहता अतिरिक्त साखर निर्यात केली आहे. कमी उत्पादन झाल्यास निर्यात करण्यास परवानगी नाही. या सर्व कारणांमुळे साखरेच्या स्टॉक्समध्ये घसरण होताना दिसत आहे.

मवाना शुगर 53 टक्के, तर राणा शुगर 50 टक्क्यांनी घसरली आहे. दुसरीकडे, अवध शुगर सुमारे 48 टक्‍क्‍यांनी, द्वारिकेश 40 टक्‍क्‍यांनी, शक्तीशुगर 37 टक्‍क्‍यांनी आणि रेणुका शुगर 30 टक्‍क्‍यांनी घसरली आहे.

नुकतेच साखर कंपन्यांनी तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कंपन्यांमधील मवाना शुगर्सच्या निकालांवर नजर टाकल्यास, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, मवाना शुगर्सचा नफा वार्षिक आधारावर 64.9 टक्क्यांनी घसरून 5.3 कोटी रुपये झाला आहे.

जे मागील वर्षी याच कालावधीत 15.1 कोटी रुपये होते. त्याच वेळी, कंपनीचा महसूलही वार्षिक आधारावर 1.2 टक्क्यांनी घसरला आणि 481.8 कोटी रुपयांवर पोहोचला.

वार्षिक आधारावर, कंपनीचा एबिटदा तिसऱ्या तिमाहीत 33.2 कोटी रुपयांवरून 41.3 टक्क्यांनी घसरून 19.5 कोटी रुपये झाला, तर मार्जिन 6.8 टक्क्यांवरून 4.1 टक्क्यांवर घसरली.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड! बाप-लेकाला कोर्टात हजर करणार, नव्याने गुन्हा दाखल

Pune Porsche Accident: अल्पवयीन आहे म्हणून काय झालं? उत्तराखंडमधील एकाला जामीन नाकारला, पुण्यात वेगळा न्याय कशामुळे

RR vs RCB : सामना न खेळता RCB आयपीएलमधून जाणार बाहेर? BCCIच्या 'या' नियमामुळे चाहते टेन्शनमध्ये

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; मिडकॅप निर्देशांक उच्चांकावर, कोणते शेअर्स वधारले?

Loksabha Election : अमित शहांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक;‘आप’ला मतदान करणारे पाकिस्तानी असल्याचा केला होता दावा

SCROLL FOR NEXT