
Share Market : 'या' मल्टीबॅगर होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये येणार तेजी, तज्ज्ञांना विश्वास
Share Market : शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर मल्टीबॅगर स्टॉक्सचा विचार केला पाहिजे. कारण मल्टीबॅगर स्टॉक्स कायम गुंतवणूकदारांना दमदार परतावा देतात.
तुम्हीही अशाच स्टॉक्सच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने रेपको होम फायनान्स (Repco Home Finace) कंपनीच्या शेअर्समध्ये 120 टक्क्यांची तेजी दिसू शकते असे म्हटलंय.
ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने रेपको होम फायनान्सच्या शेअर्सवर खरेदी (BUY) रेटिंग दिले आहे, शिवाय 470 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. रेप्कोचे शेअर्स सध्या 213.00 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
रेप्कोने डिसेंबर तिमाहीत 80 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो आमच्या अंदाजानुसार जास्त असल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे. कंपनीचा वार्षिक क्रेडिट खर्चही 0.5 टक्क्यांनी कमी झाला आहे असेही त्यांनी म्हटले.
रेप्कोने वार्षिक आधारावर सलग दुसऱ्या तिमाहीत सकारात्मक वाढ नोंदवली आहे. पण, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अजून बराच पल्ला गाठायचा आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून आली आहे.
गेल्या वर्षी कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये बदल झाला होता. फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीला नवीन सीईओ आणि एमडी मिळाले. नवीन नेतृत्व कंपनीसाठी फायदेशीर ठरत आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.