Share Market
Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात किंचीत घसरण; सेन्सेक्स 61,900 च्या पातळीवर बंद, आज 'या' शेअर्समध्ये...

राहुल शेळके

Share Market Closing 11 May 2023: आजच्या व्यवहार सत्रात भारतीय शेअर बाजारातील दोन प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी किंचीत घसरणीसह व्यवहार करताना दिसले. बँकिंग, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

त्यामुळे मिडकॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली. असे असतानाही सेन्सेक्स 36 अंकांच्या किंचित घसरणीसह 61,904 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18 अंकांच्या घसरणीसह 18,927 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing 11 May 2023

बाजारात सर्वाधिक विक्री होणारे क्षेत्र हे फार्मा आणि हेल्थकेअर होते. NSE वर निफ्टी फार्मा निर्देशांक 1.34% घसरून बंद झाला. खराब निकालामुळे डॉ. रेड्डीजचा शेअर 7 टक्क्यांच्या आसपास घसरला. तर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढणारे होते. याआधी बुधवारी देशांतर्गत बाजारात तेजी होती. BSE सेन्सेक्स 178 अंकांनी 61,940 वर बंद झाला आणि निफ्टी 49 अंकांनी 18,315 वर बंद झाला.

शेअर बाजारातील महत्त्वाचे मुद्दे:

  • अमेरिकेतील एप्रिल महागाईचे आकडे

  • जागतिक बाजारातून संमिश्र संकेत

  • हेवीवेट स्टॉक्समध्ये फ्लॅट ट्रेडिंग

  • फार्मा आणि ऑटो अॅन्सिलरीज कंपन्यांचे निकाल

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली. तर हेल्थकेअर, इन्फ्रा, मेटल्स, फार्मा क्षेत्रातील शेअर्स घसरले. शेअर्सच्या खरेदीमुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही तेजी दिसून आली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह आणि 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 26 वाढीसह आणि 24 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

निर्देशांक घसरणीसह बंद झाले असले तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. आज, बाजार बंद असताना, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 278.06 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे बुधवारी 277.10 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 96,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT