Signoria Creation IPO Price band, issue size, GMP, key details to know  Sakal
Share Market

Signoria Creation IPO: सिग्नोरिया क्रिएशनचा आयपीओ 12 मार्चला होणार खुला; ग्रे मार्केटमध्ये शेअर्सचा बोलबाला

Signoria Creation IPO: जयपूरच्या सिग्नोरिया क्रिएशन (Signoria Creation) या कपड्यांच्या ब्रँडचा आयपीओ 12 मार्चला येणार आहे. कंपनीने या इश्यूमधून 9.28 कोटी उभारण्याची योजना आखली आहे. 14 मार्चपर्यंत या आयपीओमध्ये बोली लावता येईल.

राहुल शेळके

Signoria Creation IPO (Marathi News): जयपूरच्या सिग्नोरिया क्रिएशन (Signoria Creation) या कपड्यांच्या ब्रँडचा आयपीओ 12 मार्चला येणार आहे. कंपनीने या इश्यूमधून 9.28 कोटी उभारण्याची योजना आखली आहे. 14 मार्चपर्यंत या आयपीओमध्ये बोली लावता येईल. गुंतवणूकदार 61-65 रुपये प्रति शेअर दराने बोली लावू शकतात. (Signoria Creation IPO Price band, issue size, GMP, key details to know)

आयपीओमध्ये 14.28 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. बोलीसाठी किमान लॉट साइज 2000 शेअर्स निश्चित करण्यात आली आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर, कंपनीच्या शेअर्सची लिस्टींग एनएसई एसएमईवर 19 मार्चला होईल.

सिग्नोरिया क्रिएशनच्या आयपीओसाठी होलानी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत आणि मार्केट मेकर होलानी कन्सल्टंट्स आहेत.

वासुदेव अग्रवाल, बबिता अग्रवाल, मोहित अग्रवाल आणि कृतिका छछंद हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. आयपीओमधील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

सिग्नोरिया क्रिएशन या कंपनीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सिग्नोरिया क्रिएशन लिमिटेडच्या प्रॉडक्ट्समध्ये महिलांसाठी कुर्ती, पँट आणि दुपट्टा सेट, टॉप्स, को-ऑर्ड सेट, गाऊन यांचा समावेश आहे.

त्याच्या दोन मॅन्युफॅक्चरिंग युनिटपैकी एक मानसरोवर, जयपूर येथे आहे आणि दुसरे सांगानेर येथे आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कंपनीचा महसूल 6.52 कोटी रुपये होता. या कालावधीत 64.52 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.

सिग्नोरिया क्रिएशनचा आयपीओ लॉन्च झालेला नाही पण आत्तापर्यंत कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 50 ते 65 रुपये म्हणजेच 76.92 टक्के अप्पर प्राइस बँडमध्ये ट्रेडिंग करत आहेत. ग्रे मार्केट हा एक अनधिकृत बाजार आहे जिथे आयपीओचे शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट होईपर्यंत ट्रेड केले जातात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT